एक्स्प्लोर
नागपुरात रस्ता रुंदीकरणासाठी गडकरी वाड्यातील जमीन जाणार
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या गडकरी वाड्याची काही जमीन रस्ते रुंदीकरणासाठी घेतली जाणार आहे.
![नागपुरात रस्ता रुंदीकरणासाठी गडकरी वाड्यातील जमीन जाणार Nagpur : Land in Nitin Gadkari's Gadkari Wada to be used for road widening latest update नागपुरात रस्ता रुंदीकरणासाठी गडकरी वाड्यातील जमीन जाणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/14215835/Nagpur-Gadkari-Wada-land-for-road-widening.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपूरचा गडकरी वाडा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णय आणि खलबतांची एक महत्त्वाची जागा. मात्र आता याच गडकरी वाड्याची काही जमीन रस्ता रुंदीकरणासाठी वापरली जाणार आहे.
नागपूरच्या अत्यंत जुन्या महाल भागातील अरुंद केळीबाग रस्ता आता विस्तारणार आहे. त्यासाठीच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या गडकरी वाड्याची काही जमीन घेतली जाणार आहे.
गडकरी वाड्याला लागून असलेला केळीबाग रस्ता आता 80 फूट रुंद होणार आहे. यासोबतच परिसरातील अनेक छोटी छोटी दुकाने आणि घरं जाणार असल्यामुळे सर्वसामान्यही धास्तावले आहेत.
गडकरी वाड्याच्या आजूबाजूला असलेल्या जमीनमालकांचे कित्येक दशकांपासून भाडेकरु आहेत. पैसे किंवा टीडीआर मिळणार नसल्याने भाडेकरुंची गैरसोय झाली आहे, त्यामुळे मालक जरी कोर्टात धावले तरी भाडेकरुंनी गडकरींकडे धाव घेतली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)