एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
उमरेडमध्ये जीपवरुन वाघाचे फोटो काढणारा कर्मचारी निलंबित
विपीन तलमले वाघ बघण्यासाठी थेट जीपच्या टपावर चढला होता. यावेळी वाघ त्याच्या समोर येऊन उभा ठाकला.
![उमरेडमध्ये जीपवरुन वाघाचे फोटो काढणारा कर्मचारी निलंबित Nagpur : Employee who clicked photos of tiger from Jeep in Umred, suspended latest update उमरेडमध्ये जीपवरुन वाघाचे फोटो काढणारा कर्मचारी निलंबित](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/02113814/Nagpur-Umred-forest-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : उमरेड अभयारण्यात वाघाचं चित्रकरण करणारी व्यक्ती अभयारण्यातील हंगामी कर्मचारी असल्याचं समोर आलं आहे. विपीन तलमले असं त्याचं नाव असून 'माझा'च्या बातमीनंतर कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.
विपीन तलमले वाघ बघण्यासाठी थेट जीपच्या टपावर चढला होता. यावेळी वाघ त्याच्या समोर येऊन उभा ठाकला. विशेष म्हणजे वाघ जीपच्या मागच्या बाजूला होता. त्यामुळे ड्रायव्हरला त्याचा अंदाजही नव्हता.
यानंतर ड्रायव्हरनं पार्किंग लाईट्स लावल्यामुळे वाघाचं लक्ष थोडं विचलित झालं. मात्र कर्मचाऱ्याचं नशीब बलवत्तर म्हणून वाघ तिथून शांतपणे निघून गेला. अन्यथा हे धाडस कर्मचाऱ्याच्या जीवावरही बेतू शकलं असतं.
उमरेड अभयारण्यात जीपच्या टपावर बसून वाघाचे फोटो
वनक्षेत्रात अशाप्रकारे जीपच्या टपावर बसून फोटो काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वनक्षेत्रात टायगर साईटसीईंग करताना कुणालाही वाहनाबाहेर निघता येत नाही किंवा शरीराचा एखादा भागही गाडीबाहेर काढता येत नाही. सुरुवातीला ही व्यक्ती पर्यटक असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यातच ही गाडी वन विभागाची असल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागानं तात्काळ पावलं उचलत कारवाई केली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)