एक्स्प्लोर
जिवंतपणी वडिलांची पूजा, नागपुरात भावाकडून भावाची हत्या
नागपूर : नागपुरातील एका घटनेनं शहर हादरुन गेलं आहे. जिवंत वडिलांच्या फोटोची धाकट्या भावाने पूजा मांडल्याने मोठ्या भावाने त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
संजय वघाडे याने नागपूरच्या आशीर्वाद नगरातल्या घरात पूजा मांडली. पूजा होती कालीमातेची. पण त्या पूजेत फोटो होता संजयच्या मुलाचा आणि वडिलांचा, जे जिवंत आहेत.
हे पाहून भावाने त्याला विचारणा केली की, तू अशी पूजा का करतोस. त्यावर ते दोघेही माझ्यासाठी मेले, तुम्हीही निघून जा, मला घर विकायचंय असं उत्तर दिलं. व्यसनी असलेल्या संजयच्या या कृत्याने त्याचा भाऊ राजेंद्र भडकला आणि ज्याची भीती होती, तेच झालं. त्यानं कुऱ्हाड आणली आणि दारात पहुडलेल्या संजयवर त्याने हल्ला केला. मात्र रुग्णालयात संजयचा मृत्यू झाला.
रक्ताळलेली कुऱ्हाड घेऊन राजेंद्र पोलिसात पोहोचला आणि कृत्याची कबुली दिली. पण दुसरीकडे संजयनं अशी पूजा का बांधली हे मात्र कोडंच आहे. तो आस्तिक नव्हता, फक्त नवरात्र करायचा, त्यानं असं का केलं असावं कळत नाही, असं मयत संजयची पत्नी सांगते.
या हत्येमागे अंधश्रद्धेचा प्रकार आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. पण द्वेषाच्या भावनेनं एका कुटुंबाला उद्ध्वस्त करुन टाकलं, हे खरं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement