एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
एकदा मृत्यूचा चकवा, मात्र काळाने 24 तासात पुन्हा गाठलं
ज्या मुलाला या रुग्णवाहिकेतून नेलं जात होतं, त्याचा काही वेळापूर्वी अपघात झाला होता. रुग्णवाहिकेतून नागपूरला नेलं जात असताना काळानं पुन्हा त्याला गाठलं.
नागपूर : मृत्यूला त्याने एकदा चकवा दिला, मात्र काळाने त्याला 24 तासांच्या आत पुन्हा गाठलं. अपघातातून बचावलेल्या 12 वर्षांच्या चिमुरड्याला रुग्णवाहिकेने नेताना तिलाही पुन्हा अपघात झाला. यामध्ये चिमुरड्यासह त्याच्या आईनेही जीव गमावला.
नागपूर-अमरावती महामार्गावर रुग्णवाहिका आणि ट्रकच्या अपघातात अकोल्यातील चौघांचा बळी गेला. ज्या मुलाला या रुग्णवाहिकेतून नेलं जात होतं, त्याचा काही वेळापूर्वी अपघात झाला होता. रुग्णवाहिकेतून नागपूरला नेलं जात असताना काळानं पुन्हा त्याला गाठलं.
अपघातात 12 वर्षांचा आकाश भालेराव, त्याची 34 वर्षीय आई विमल भालेराव आणि 40 वर्ष श्रीराम धारपवार, तसंच 30 वर्षीय प्रमोद बंड या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. आकाशचे वडील आणि अन्य चौघं या अपघातात जखमी झाले आहेत.
सोमवारी पहाटे चार ते साडेचार वाजताच्या दरम्यान हा अपघात घडला. चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement