एक्स्प्लोर
खामोश! खा. नाना पटोलेंच्या तोंडी शत्रुघ्न सिन्हांचा डायलॉग
नागपुरातील पत्रकार परिषदेत भाजपवर टीका करताना नाना पटोले यांनी आपले जवळचे सहकारी असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांचा 'खामोश' हा डायलॉग बोलून दाखवला
नागपूर : भाजप खासदार नाना पटोले यांची सर्वसामांन्यामध्ये कसलेले नेते अशी ओळख आहे. ही नेतेगिरी करता-करता नाना पटोले थेट अभिनेत्याच्या भूमिकेत शिरल्याचं पहायला मिळालं. पटोलेंनी चक्क शत्रुघ्न सिन्हांची मिमिक्री केली.
नागपुरातील पत्रकार परिषदेत भाजपवर टीका करताना नाना पटोले यांनी आपले जवळचे सहकारी असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांचा 'खामोश' हा डायलॉग बोलून दाखवला. नाना पटोलेंच्या या डायलॉगनंतर पत्रकार परिषेदेत एकच हशा पिकला.
दरम्यान, एक डिसेंबरला अकोला येथे सोयाबीन, कापूस व धान परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित राहणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. यावेळी नाना पटोलेंनी नेहमीप्रमाणे भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दारुच्या ब्रँडबाबतच्या वक्तव्या प्रकरणी कारवाईची मागणी करत, भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांच्याही त्रुटी त्यांनी दाखवल्या. यातून नाना पटोलेंनी पक्षातून बाहेरच्या मार्गावर पडण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement