एक्स्प्लोर

अकोला जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल

तेल्हारा नगरपालिका : एकूण जागा : 17 भाजप : 05 शेतकरी आघाडी : 05 प्रहार आघाडी : 02 शहरविकास आघाडी : 01 काँग्रेस-राष्ट्रवादी : 02 नगरसेवा समिती : 02 भाजपच्या जयश्री फुंडकर नगराध्यक्ष 2) बाळापूर : एकूण जागा : 23 काँग्रेस : 16 परिवर्तन आघाडी : 07 काँग्रेसचे ऐनोद्दीन नतीकोद्दीन खतीब नगराध्यक्ष 3) मुर्तिजापूर अंतिम पक्षीय बलाबल : एकूण जागा : 23 भाजप : 07 सेना :04 भारिप -बमसं : 04 काँग्रेस : 01 राष्ट्रवादी : 05 अपक्ष : 02 भाजपच्या मोनाली गावंडे नगराध्यक्ष 4) पातूर अंतिम पक्षीय बलाबल : एकूण जागा : 17 भाजप : 03 काँग्रेस : 06 राष्ट्रवादी : 08 काँग्रेसच्या प्रभा कोथळकर नगराध्यक्ष 5) अकोट अंतिम पक्षीय बलाबल : एकूण जागा : 33 भाजप : 17 सेना :03 काँग्रेस-राष्ट्रवादी : 11 भारिप -बमसं : 02 भाजपचे हरीनारायण माकोडे नगराध्यक्ष अकोला जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार
  1. अकोट : हरीनारायण माकोडे (भाजप)
  2. बाळापूर : ऐनोद्दीन नतीकोद्दीन खतीब (काँग्रेस)
  3. तेल्हारा : जयश्री फुंडकर (भाजप)
  4. मुर्तिजापुर : मोनाली गावंडे (भाजप)
  5. पातुर : प्रभा कोथळकर (काँग्रेस)
 

1. अकोट नगरपालिका :

अकोट... अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका...पण मोठेपण मिरवणाऱ्या अकोट शहराचे प्रश्नही तेव्हढेच मोठे आणि लांबलचक... पण, हेच अकोट शहर सध्या नगरपालिका निवडणुकीच्या राजकीय रंगात अगदी रंगून गेलं आहे. अकोटचं नगराध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्याने जिल्ह्यातील सर्वाधिक 'हायव्होल्टेज' लढत अकोटमध्ये रंगणार आहे. 33 जागा असणाऱ्या अकोटमध्ये काँग्रेसचे जेष्ठ नेते  सुधाकर गणगणे यांच्यासह भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे, सेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. मात्र, सेना, भाजप, भारिपसह एमआयएम ही निवडणूक स्वबळावर लढत आहे. - अकोट नगरपालिकेची प्रभाग संख्या : 16 प्रभाग आणि सदस्यसंख्या : 33 - सध्या कुणाची सत्ता (2012 ते 2016), विद्यमान नगराध्यक्ष कोण, कोणत्या पक्षाचा/आघाडीचा : अकोटमध्ये सध्या राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेविका सुनिता चंडालिया या काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि भारिप-बहुजन महासंघाच्या पाठिंब्याने सत्तेवर आहेत. - निवडणूक लढवणारे प्रमुख पक्ष, त्यांची आघाडी/युती : अकोटमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. मात्र, सेना, भाजप, भारिपसह एमआयएम स्वतंत्रपणे लढत आहेत. - स्थानिक आमदार कोण/पक्ष : प्रकाश भारसाकळे (भाजप) - थेट नगराध्यक्ष निवडणूक पदासाठी उमेदवार किती, कोणत्या पक्षाचे, कोणतं आरक्षण : अकोटचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण आहे. एकूण 10 उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवकपदाच्या 33 जागांसाठी 157 उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख उमेदवार : 1) रामचंद्र बरेठिया : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 2) हरिनारायण माकोडे : भाजप 3) दिलीप बोचे : शिवसेना 4) सैय्यद शरीफ सैय्यद सिकंदर : भारिप बहुजन महासंघ 5) अजहर खान मुजफ्फर खान : एमआयएम अकोट नगरपालिकेचं सध्याचं राजकीय बलाबल : एकूण जागा : 31 1) नगरसुधार आघाडी - 10 2) काँग्रेस - 13 3) भारिप बहुजन महासंघ - 04 4) शिवसेना - 01 5) भाजप - 02 6) राष्ट्रवादी - 01 --------------

2. तेल्हारा नगरपालिका :

तेल्हारा ही जिल्ह्यातील पातूरनंतर दुसरी 'ड' वर्ग नगरपालिका आहे. भाजपचं वर्चस्व असलेल्या या शहरात सध्या भाजप अंतर्गत भांडणांनी ग्रासला आहे. तेल्हाऱ्याचं नगराध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. 17 जागा असणाऱ्या तेल्हारामध्ये भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे, सेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. भाजपने शेतकरी सहकार पॅनलसोबत तर भारिपने स्थानिक नगरसेवा समितीसोबत युती केली आहे. मात्र, शिवसेना येथे स्वबळावर लढत आहे. याशिवाय तेल्हारा विकास मंचने नगराध्यक्षपदासह 17 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. - तेल्हारा नगरपालिकेची प्रभाग संख्या : 08 प्रभाग आणि सदस्यसंख्या : 17 - सध्या कुणाची सत्ता (2012 ते 2016), विद्यमान नगराध्यक्ष कोण, कोणत्या पक्षाचा/आघाडीचा : तेल्हारामध्ये सध्या भाजपच्या कान्होपात्रा फाटकर  या शेतकरी पैनलच्या पाठिंब्याने सत्तेवर आहेत. मात्र, पक्षविरोधी कारवायांमुळे त्यांना भाजपने पक्षातून निलंबित केलं आहे. त्या आता शिवसेनेच्या तिकीटावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहेत. - निवडणूक लढवणारे प्रमुख पक्ष, त्यांची आघाडी/युती : तेल्हारामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. भाजपने शेतकरी सहकार पॅनलसोबत तर भारिपने स्थानिक नगरसेवा समितीसोबत युती केली आहे. मात्र, शिवसेना येथे स्वबळावर लढत आहे. याशिवाय तेल्हारा विकास मंचाने नगराध्यक्षपदासह 17 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. - स्थानिक आमदार कोण/पक्ष : प्रकाश भारसाकळे (भाजप) - थेट नगराध्यक्ष निवडणूक पदासाठी उमेदवार किती, कोणत्या पक्षाचे, कोणतं आरक्षण : तेल्हाराचं नगराध्यक्षपद ओबीसी महिला गटासाठी राखीव आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण 07 उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 71 उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख उमेदवार : 1) खान वहिदा फिरोज खान : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 2) जयश्री पुंडकर : भाजप-शेतकरी सहकार पॅनल 3) कान्होपात्रा फाटकर : शिवसेना 4) निधी अग्रवाल : भारिप- बहूजन महासंघ-नगरसेवा समिती 5) सुशीला राठी : तेल्हारा विकास मंच - तेल्हारा नगरपालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल : एकूण जागा : 17 1) भाजप - 06 2) नगरविकास आघाडी - 03 3) शेतकरी आघाडी- शिवसेना - 03 4) भा.रि.प. बहुजन महासंघ - 02 5) अपक्ष - 01 --------------

3. बाळापूर नगरपालिका :

अकोला जिल्ह्यातील 80 टक्के मुस्लिम लोकवस्ती असलेलं बाळापूर शहर.  सध्या बाळापूरमध्ये नगरपालिका निवडणूक रणधुमाळीने चांगलाच जोर पकडला आहे. येथील राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथील नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाच्या खतीब कुटुंबीयांचा एकछत्री अंमल आहे. 1934 साली बाळापूर नगरपरिषदेची स्थापन झाली. मात्र स्थापनेनंतरच्या जवळपास 81 वर्षांपैकी तब्बल 56 वर्षांपासून येथील सत्तेवर एकछत्री अंमल राहिलाय तो काँग्रेसच्या खतीब घराण्याचा.  मात्र, मागच्या पाच वर्षांत खतीब घराण्याच्या सत्तेला हादरा देत चार वर्ष सत्ता हिसकावून घेतली. एरव्ही आघाडी करुन लढणाऱ्या काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी या पक्षांनी स्वबळावर मैदानात उडी घेतली आहे. तर खतीबांना नामोहरम करणाऱ्या अनेक पक्षांतील लोकांचा सहभाग असणाऱ्या परिवर्तन आघाडीने यावेळीही शड्डू ठोकले आहेत. भा.रि.प. बहुजन महासंघांने एमआयएमसोबत आघाडी करत दलित-मुस्लीम मतदारांची मोट बांधण्याचा प्रयत्न चालवला आहे. - बाळापूर नगरपालिकेची प्रभाग संख्या : 11 प्रभाग आणि सदस्यसंख्या : 23 - सध्या कुणाची सत्ता (2012 ते 2016), विद्यमान नगराध्यक्ष कोण, कोणत्या पक्षाचा/आघाडीचा : बाळापूरमध्ये सध्या परिवर्तन आघाडीचे शेख जमीर मोहम्मद इब्राहिम हे नगराध्यक्ष आहेत. या आघाडीत भाजप, राष्ट्रवादी आणि भारिपचा समावेश होता. हे पक्ष या आघाडीतून बाहेर पडले तरी ही आघाडी मात्र कायम आहे. - निवडणूक लढवणारे प्रमुख पक्ष, त्यांची आघाडी/युती : एरव्ही आघाडी करुन लढणाऱ्या काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी या पक्षांनी पहिल्यांदाच स्वबळावर मैदानात उडी घेतली आहे. तर खतीबांना नामोहरम करणाऱ्या अनेक पक्षांतील काही लोकांचा सहभाग असणाऱ्या परिवर्तन आघाडीने यावेळीही शड्डू ठोकले आहे. शिवसेनेने येथील निवडणुकीपासून दूर राहणं पसंत केलं आहे. भारिप बहुजन महासंघांने एमआयएमसोबत आघाडी करत दलित-मुस्लीम मतदारांची मोट बांधण्याचा प्रयत्न चालवला आहे. - स्थानिक आमदार कोण/पक्ष : बळीराम सिरस्कार (भारिप-बहुजन महासंघ). - थेट नगराध्यक्ष निवडणूक पदासाठी उमेदवार किती, कोणत्या पक्षाचे, कोणतं आरक्षण : बाळापूरचं नगराध्यक्षपद ओबीसी पुरुष गटासाठी राखीव आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण 08 उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवकपदाच्या 23 जागांसाठी 89 उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख उमेदवार : 1) सैय्यद ऐनोद्दीन खतीब : काँग्रेस 2) कमलादेवी शर्मा : भाजप 3) शेख जमीर शेख इब्राहिम : परिवर्तन आघाडी 4) मो. फजलूर रहेमान अंसारी : भारिप बहुजन महासंघ-एमआयएम 5) आदील रशीद शेख बिलाल : राष्ट्रवादी काँग्रेस - बाळापूर नगरपालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल : एकूण जागा : 21       पक्ष/आघाडी                   जागा     पक्षांतरानंतर 1)  नगरविकास आघाडी          11         09 (खतीब गट) 2)   परिवर्तन आघाडी              10         12 --------------

4. पातूर नगरपालिका :

मागच्या पाच वर्षांमध्ये पक्षांतरांनी गाजलेल्या अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये नगरपालिका निवडणूक रणधुमाळीने चांगलाच जोर पकडला आहे. पातूरमध्ये मुख्य लढत ही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रबळ समजल्या जाणाऱ्या काँग्रेसमध्ये होणार आहे. यासोबतच भाजप, शिवसेनेने येथे स्वबळावर उमेदवार उभे केले आहेत. तर भारिपने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार न देता फक्त नगरस्वक पदासाठी तीन उमेदवार उभे केले आहे. - पातूर नगरपालिकेची प्रभाग संख्या : 08 प्रभाग आणि सदस्यसंख्या : 17 - सध्या कुणाची सत्ता (2012 ते 2016), विद्यमान नगराध्यक्ष कोण, कोणत्या पक्षाचा/आघाडीचा : पातूरमध्ये सध्या राष्ट्रवादीचे हिदायतखा रुमखा हे भाजपच्या पाठिंब्याने सत्तेवर आहेत. - निवडणूक लढवणारे प्रमुख पक्ष, त्यांची आघाडी/युती : पातूरमध्ये सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढत आहेत. मुख्य लढत ही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रबळ समजल्या जाणाऱ्या काँग्रेसमध्ये होणार आहे. यासोबतच भाजप, शिवसेना या पक्षांनी स्वबळावर  उमेदवार उभे केले आहेत. स्थानिक आमदार कोण/पक्ष : बळीराम सिरस्कार  (भारिप-बहुजन महासंघ) - थेट नगराध्यक्ष निवडणूक पदासाठी उमेदवार किती, कोणत्या पक्षाचे, कोणतं आरक्षण : पातूरचं नगराध्यक्षपद अनुसुचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण 08 उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 100 उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख उमेदवार : 1) मंगला वानखडे : राष्ट्रवादी काँग्रेस 2) रेखा गोतरकर : भाजप 3) कल्पना शेगोकार : शिवसेना 4) प्रभा कोथळकर :  काँग्रेस - पातूर नगरपालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल : एकूण जागा : 17       पक्ष/आघाडी               जागा      पक्षांतरानंतर 1) नगरविकास आघाडी   07             00 2) राष्ट्रवादी काँग्रेस         04             09 3) काँग्रेस                       02             06 4) भाजप                       02              02 5) अपक्ष                        02              00 --------------

5. मुर्तिजापूर नगरपालिका :

मुर्तिजापूर नगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीला सध्या चांगलीच रंगत चढली आहे.  सध्या ही पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. बाळापूरनंतर ही जिल्ह्यातील दुसरी 'क' वर्ग नगरपालिका आहे. येथे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप, भारिप-बहुजन महासंघ, मनसे हे पक्ष स्वबळावर  लढत आहेत. 11 प्रभागातून 23 सदस्य निवडून जाणार आहेत. मुर्तिजापूरचं नगराध्यक्षपद हे महिलांच्या खुल्या गटासाठी राखीव आहे.  सलग दुसऱ्यांदा विधानसभा जिंकल्यानंतर आता नगरपालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. - मुर्तिजापूर नगरपालिकेची प्रभाग संख्या : 11 प्रभाग आणि सदस्यसंख्या : 23 - सध्या कुणाची सत्ता (2012 ते 2016), विद्यमान नगराध्यक्ष कोण, कोणत्या पक्षाचा/आघाडीचा : मुर्तिजापूरमध्ये सध्या राष्ट्रवादीचे पवन अव्वलवार हे नगराध्यक्ष आहेत. पाच वर्ष राष्ट्रवादीने काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेला सोबत घेत सत्ता उपभोगली आहे. - निवडणूक लढवणारे प्रमुख पक्ष, त्यांची आघाडी/युती : येथे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप, भारिप-बहुजन महासंघ, मनसे हे पक्ष स्वबळावर  लढत आहेत. 11 प्रभागातून 23 सदस्य निवडून जाणार आहेत. - स्थानिक आमदार कोण/पक्ष : हरिश पिंपळे  (भाजप) - थेट नगराध्यक्ष निवडणूक पदासाठी उमेदवार किती, कोणत्या पक्षाचे, कोणतं आरक्षण : मुर्तिजापूरचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला  गटासाठी राखीव आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण 06 उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवकपदाच्या 23 जागांसाठी 131 उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख उमेदवार : 1) नसरीन तब्बस्सूम निजामोद्दीन : राष्ट्रवादी काँग्रेस 2) मोनाली गावंडे : भाजप 3) संगीता गुल्हाणे : शिवसेना 4) पूनम महाजन : भारिप- बहुजन महासंघ 6) आस्था जेठवाणी : काँग्रेस - मुर्तिजापूर नगरपालिका पक्षीय बलाबल : एकूण जागा - 21 1) राष्ट्रवादी काँग्रेस - 07 2) भारिप बहुजन महासंघ - 05 3) शिवसेना - 03 4) भाजप- 02 5) काँग्रेस - 01 6) अपक्ष - 03
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी

व्हिडीओ

Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
Embed widget