एक्स्प्लोर
Advertisement
एसटीतील मुस्लिम कर्मचाऱ्यांना ईदनिमित्त अनोखी भेट
मुस्लिम बांधवांचा सण लक्षात घेऊन त्यांचं वेतन तातडीने उद्याच म्हणजेच 4 जून रोजी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई : एसटीतील मुस्लिम कर्मचाऱ्यांना रमजान ईद उत्साहात साजरी करता यावी, यासाठी त्यांचं मे महिन्याचं वेतन तीन दिवस अगोदर देण्याचे आदेश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. एसटी महामंडळाच्या 71 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन दर महिन्याच्या सात तारखेला होतं. मात्र यंदा पाच जूनला ईद उल फितर (रमजान ईद) आहे. मुस्लिम बांधवांचा सण लक्षात घेऊन त्यांचं वेतन तातडीने उद्याच म्हणजेच 4 जून रोजी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या 71 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय घेऊन रावतेंनी एसटी महामंडळातील मुस्लिम कर्मचाऱ्यांना ईदची अनोखी भेट दिली आहे. सर्व मुस्लिम बांधवांना त्यांनी ईदनिमित्त हार्दिक शुभेच्छाही व्यक्त केल्या आहेत.
एसटी महामंडळात सुमारे एक लाख कर्मचारी आहेत. या सर्वांचा पगार दर महिन्याला सात तारखेला होतो. परंतु अशा विशेष सण, उत्सवावेळी त्यांना कपडे खरेदी किंवा इतर खर्चासाठी पैशाची अत्यंत निकड असते. त्यामुळे त्यांना अॅडव्हान्स पगार मिळाला तर सण, उत्सवाचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. या भावनेने एसटी महामंडळाने रावतेंच्या आदेशान्वये यापूर्वीदेखील दिवाळी, गणपती उत्सव अशा विशेष सणाला सात तारखेऐवजी अगोदर वेतन दिले आहे.
एसटीमध्ये कार्यरत असलेल्या मुस्लिम बांधवांना ईद साजरी करण्यास पैशाअभावी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पगार जून महिन्याच्या चार तारखेला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याच्या सूचना दिवाकर रावतेंनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. या निर्णयाचे सर्व मुस्लिम कर्मचारी बांधवांकडून स्वागत होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement