एक्स्प्लोर
भावकीतला वाद, घरासमोर कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघा भावांची हत्या, 7 आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल
Nanded News : नांदेड शहरात दोन सख्ख्या भावांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणावरुन ही हत्या झाली आहे.
Nanded News : सध्याच्या जगात अगदी साध्या-साध्या कारणांवरुन होणाऱ्या वादातही व्यक्ती टोकाचं पाऊल उचलत असतात. अगदी कचरा घरासमोर फेकण्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादामध्ये चक्क दोन सख्या भावांचा खून झाला आहे. विशेष म्हणजे वाद झालेल्या व्यक्तीही नात्यातीलच आहेत. नांदेडमध्ये ही घटना घडली आहे.
नांदेड शहरातील (Nanded) देगाव चाळ परिसरात कचरा टाकण्यावरुन झालेल्या वादातून दोघा सख्ख्या भावांना प्राणा गमवावा लागला आहे. कचरा टाकण्यावरून घरा शेजारी राहणाऱ्या विशेष म्हणजे भावकीतील असणाऱ्या चुलत भावांसोबत एका कुटुंबाचा किरकोळ वाद झाला. दरम्यान या वादाचे परीवर्तन मोठ्या भांडणात होऊन यामध्ये दोन सख्या भावांना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात आरोपी असणाऱ्या एकाने दोन चुलत भावांवर चाकूने सपासप वार करून त्यांची हत्या केली आहे. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या 35 वर्षीय प्रफुल्ल राजभोज आणि 33 वर्षीय संतोष राजभोज या दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नांदेड शहरातील देगावचाळ भागात ही धक्कादायक आणि मन हेलावणारी घटना घडली असून आहे. साक्षीदारासही पोटात चाकू मारुन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद शहरातील वजिराबाद पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी वजीराबाद पोलिसात 7 आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतर 4 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- पत्नीनं पहिलं लग्न लपवलं, त्रासाला कंटाळून पतीनं जीवन संपवलं! दौंडमधील धक्कादायक घटना
- Sanjay Raut Press Confarnce : बाप-बेटे जेलमध्ये जाणारच, संजय राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल
- Disha Salian Case : राणे पिता-पुत्र हाजीर हो; दिशा सालियन प्रकरणी मालवणी पोलिसांची नोटीस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement