एक्स्प्लोर
मुलीची छेडछाड करणाऱ्या अल्पवयीन तरुणाची हत्या
सागरकडून छेडछाड होत असल्याने मुलीच्या नातेवाईकांनी शुक्रवारी दुपारी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरून 354 अन्वये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, त्याच दिवशी रात्री सागरला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे.
लातूर : माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलीची छेड काढणाऱ्या अल्पवयीन तरुणाचा मुलीच्या नातेवाईकांनी खून केल्याची घटना रेणापूर तालुक्यातील तळणी येथे घडली आहे. शुक्रवारी रात्री 8 च्या दरम्यान गावातील शाळेजवळ ही घटना घडली असून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सागर बालाजी मोमले (17) असे मयत तरुणाचे नाव असून त्याने शाळेत जाणाऱ्या मुलीची छेड काढत असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी शुक्रवारी मुलीच्या नातेवाईकांनी चाकूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. रात्री 8 च्या दरम्यान गावातीलच विद्या विकास शाळेजवळ सागर आला असता सदरील मुलीचे वडील, भाऊ, चुलते व इतर पाच जणांनी त्यास बेदम मारहाण केली. यामध्ये सागरचा जागीच मृत्यू झाला.
यापूर्वीही सागरकडून छेडछाड होत असल्याने मुलीच्या नातेवाईकांनी शुक्रवारी दुपारी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरून 354 अन्वये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, त्याच दिवशी रात्री सागरला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी रात्री सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला होता. शनिवारी सकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सागरचा भाऊ आकाश मोमले याच्या फिर्यादीवरून चाकूर ठाण्यात मुलीचे वडील, भाऊ, चुलते व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement