एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशकात सहा लाखांची लूट करून व्यावसायिकाची हत्या
अविनाश शिंदे असं व्यावसायिकाचे नाव आहे. ते दुकान बंद करुन घरी जात असताना हा हल्ला झाला. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात ही घडली आहे.
नाशिक : नाशिकमध्ये सहा लाखांची लूट करून व्यावसायिकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. अविनाश शिंदे असं व्यावसायिकाचे नाव आहे. ते दुकान बंद करुन घरी जात असताना हा हल्ला झाला. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात ही घडली आहे.
अविनाश शिंदे हे नाशिकमधील सुपर ग्राहक बाजार या मिनी सुपर मार्केटचे संचालक होते. रात्री ते दुकान बंद करुन घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अविनाश यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र अविनाश शिंदे यांनी विरोध करताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांच्या हातात असलेली पैशांची बॅग घेऊन पळून गेले.
अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात अविनाश शिंदे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा एक पथक रवाना झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement