एक्स्प्लोर

मुन्ना यादव नागपुरातील फार्म हाऊसवरच, विखे-पाटलांचा गौप्यस्फोट

‘मुन्ना यादवचा नागपूर पोलीस रात्रंदिवस शोध घेत आहेत. तो सापडत नसल्याचे सांगितलं जात आहे. परंतु, हा मुन्ना यादव आजही नागपूरपासून २२ किलोमीटर अंतरावरील एका फार्म हाऊसमध्ये दडून बसला आहे.’

नागपूर : नागपूर पोलिसांना हवा असलेला हत्येच्या प्रयत्नातील आरोपी मुन्ना यादव नागपूर पासून २२ किलोमीटर अंतरावरील एका फार्महाऊसवर दडून बसल्याचा गौप्यस्फोट विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (शुक्रवार) सभागृहात केला. राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना त्यांनी ही माहिती सभागृहाला दिली. ते म्हणाले की, ‘मुन्ना यादवचा नागपूर पोलीस रात्रंदिवस शोध घेत आहेत. तो सापडत नसल्याचे सांगितलं जात आहे. परंतु, हा मुन्ना यादव आजही नागपूरपासून २२ किलोमीटर अंतरावरील एका फार्म हाऊसमध्ये दडून बसला आहे.’ ‘मुन्ना यादव नेमका कुठे आहे, याची माहिती सभागृहात जाहीर झाल्यामुळे तो तिथून फरार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पोलिसांनी नागपूरमधील भाजपचे नगरसेवक विक्की कुकरेजा यांची सखोल चौकशी करावी. मागील आठवडाभरातील त्यांचे मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड्स तपासावे. पोलिसांना मुन्ना यादवचे धागेदोरे मिळतील.’ असेही त्यांनी सांगितलं. ‘या सरकारने क्षुल्लक राजकीय हेतूसाठी गुंडांना पाठीशी घालण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे समाजात ‘मुन्ना यादव’ निर्माण होऊ लागले आहेत. नागपूर पोलिसांना मुन्ना यादव सापडत नसेल तर त्यांनी त्याला फरार घोषित करावे. त्याला पकडण्यासाठी ५० हजारांचे बक्षीस जाहीर करावे. बक्षीसाची रक्कम द्यायला आपण तयार आहोत.’ असंही विखे-पाटील यावेळी म्हणाले. मुन्ना यादवविरूद्ध कारवाई करण्याबाबत सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम त्याला इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदावरून बडतर्फ करावे, अशीही मागणीही विखे-पाटील यांनी केली.

... तर मुंबई पोलिस मुन्ना यादवला अटक करतील : माथुर

दरम्यान, याच मुन्ना यादव प्रकरणावरुन पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी नागपूर पोलिसांना काही दिवसांपूर्वी सुनावलं होतं.  ‘जर नागपूर पोलिस शोधू शकत नसतील, तर त्यांनी मुंबई पोलिसांना सांगावं, आम्ही मुंबईत त्याला अटक करु.’ असं ते म्हणाले  होते. मात्र, त्यांच्या या बोलण्याचा देखील नागपूर पोलिसांवर परिणाम झालेला नाही. कारण अद्यापही मुन्ना यादवला शोधण्यात नागपूर पोलिसांना यश आलेलं नाही. संबंधित बातम्या : नागपूर पोलिसांना आरोपी मुन्ना यादव सापडेना! नागपुरातील भाजप नेते मुन्ना यादव यांची CID चौकशी सुरु स्वातंत्र्यदिनाच्या रॅलीत धिंगाणा, मुन्ना यादवांच्या मुलांवर गुन्हा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : Eknath Khadse यांचा फोन आला...म्हणाले,Aaditya Thackeray Majha Vision : खिचडीचा घोटाळा झाला की नाही? आदित्य ठाकरे म्हणतात... ABP MajhaAaditya Thackeray Majha Vision : आम्ही बोलायचो ते भाजपला टोचायचं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल...ABP Majha Headlines : 05 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Kartiki Gaikwad Pregnancy News :  'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
Embed widget