एक्स्प्लोर
Advertisement
ज्येष्ठ पत्रकार वसुंधरा पेंडसे नाईक कालवश
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या माजी संचालिका वसुंधरा पेंडसे नाईक यांचं आज प्रदीर्घ आजाराने निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कसोटीपटू सुधीर नाईक यांच्या त्या पत्नी होत्या.
मराठी तसंच संस्कृत भाषेच्या त्या गाढ्या अभ्यासक होत्या. वसुंधरा पेंडसे नाईक यांनी 'लोकसत्ता' या वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून जबाबदारी सांभाळली, शिवाय 'लोकप्रभा' साप्ताहिकाच्या कार्यकारी संपादक तर दै.'नवशक्ति'च्या संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद अध्यक्षा, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा तसंच महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या तसंच मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या संचालक म्हणूनही त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. मुंबई दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या अमृत मंथन कार्यक्रमाचं संहिता लेखन आणि सादरीकरणही त्यांनी केलं आहे.
भारत निर्माण संस्थेच्या 1999 या वर्षीच्या टॅलेंटेड लेडीज अवॉर्डच्या त्या मानकरी होत्या. त्यांच्या निधनाने एक विचारवंत, अभ्यासू पत्रकार हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement