मुंबईकरांनो सावधान! दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
मुंबईत देखील आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या मध्य मुंबईत देखील ढगाळ वातावरण झालं आहे.
Mumbai Rain News : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) आजही राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. मुंबईत देखील आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या मध्य मुंबईत देखील ढगाळ वातावरण झालं आहे. दरम्यान, आज मुंबईतील दादार येथील शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा (Dussehra Melava) होत आहे. तर आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. मात्र, या दोन्ही मेळाव्यावर पावसाचं सावट आहे.
मुंबईसाठी आज पावसाचा यलो अलर्ट जारी
मुंबईत आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. आज वाऱ्यांचा वेग हा 30-40 किमी प्रति तास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबईसाठी आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
17 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता
पुढील 5 दिवस म्हणजे मंगळवार 16 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा 18 जिल्ह्यात व विदर्भात 13 ते 15 ऑक्टोबर (3 दिवस) 11 जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना वाफसा असेल त्या शेतकऱ्यांनी पावसाची विशेष भीती न बाळगता शेतीची काम उरकण्यास हरकत नसल्याचे मत खुळे यांनी व्यक्त केले. बुधवार दिनांक 17 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात पुन्हा काहीसं पावसाळी वातावरण चित्रित होण्याची शक्यता जाणवते. शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा बियाणं 12 ऑक्टोबर नंतरच टाकण्यास हरकत नसल्याचे खुळे म्हणाले. 12 किंवा 18 ऑक्टोबर नंतर जरी किरकोळ पाऊस झाला तरी हुळं उताराला विशेष अपायकराकता जाणवणार नाही.
परतीचा मान्सून जागेवरच
5 ऑक्टोबरला परतीच्या वाटेवरील मान्सून अजूनही केवळ महाराष्ट्र राज्याच्या उंबरठ्यावर म्हणजे नंदुरबार पर्यंत येऊन थांबलेला आहे. आज सप्ताह उलटला तरी अजुन तो नंदुरबारमध्येच उभा आहे. अर्थात त्याच्या पुढील वाटचालीस अनुकूलता असली तरी प्रत्यक्षात जेव्हा तो जाग्यावरून हलेल, तेव्हाच महाराष्ट्रातील परतीच्या पावसाबाबत बोलणं योग्य ठरेल असे माणिकराव खुळे म्हणाले. राज्यातील वातावरणात बदल होत आहे. कुठं पाऊस सुरु आहे, तर कुठं पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, यावर्षी देशासह राज्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या: