एक्स्प्लोर

Mumbai Pune Expressway Closed Today: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज पुन्हा ट्रॅफिक ब्लॉक; कधीपासून कधीपर्यंत राहणार बंद?

Mumbai Pune Expressway Closed Today: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज पुन्हा ब्लॉक घेण्यात येणार असून एक तासांसाठी महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

Mumbai Pune Expressway Wil Be Closed Today 23rd May For One Hour: मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) आज, गुरूवार, 23 मे रोजी एक तासाचा वाहतूक ब्लॉक ठेवण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान, एक्स्प्रेसवेच्या पुणे ते मुंबई मार्गावर वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा उपकरणं बसवण्याचं काम केलं जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) नुसार, हा ब्लॉक दुपारी 12 ते 1 दरम्यान असेल.

...म्हणून घेतला जाणार एक तासाचा ब्लॉक

ब्लॉक दरम्यान एक्स्प्रेस वेवरील वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. वाहनचालकांची सोय लक्षात घेऊन एमएसआरडीसीनं वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल केले आहेत. याअंतर्गत पुण्याहून मुंबईकडे द्रुतगती मार्गानं येणारी हलकी वाहनं जुन्या मुंबई-पुणे महामार्गानं मुंबईच्या दिशेनं वळवण्यात येतील, तर खोपोली एक्झिटमधून बसेस जुन्या महामार्गावरून खोपोली शहराच्या दिशेनं, शेडुंग टोलनाका मार्गे आणि अवजड वाहनं वळवण्यात येतील. खालापूर टोलनाक्यावरून वाहनं द्रुतगती मार्गानं मुंबईकडे वळवली जातील. द्रुतगती मार्गावरील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी 95 किमी लांबीच्या महामार्गावर ITMS बसविण्याचं काम गेल्या वर्षाच्या अखेरीपासून सुरू आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेची वैशिष्ट्य

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 94.5 किलोमीटर लांबीचा आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांमधील अंतर कमी करण्यासाठी मुंबई-पुणे महामार्ग बांधण्यात आला होता. वर्ष 2002 मध्ये हा महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाला. या महामार्गामुळे चार ते पाच तासांचा मुंबई-पुण्याचा प्रवास अवघ्या दोन ते अडीच तासांत पूर्ण करता येतो. राज्यभरातील सर्वात महत्त्वाच्या महामार्गांपैकी मुंबई-पुणे महामार्ग एक समजला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महामार्गावरुन दररोज तब्बल एक लाख 55 हजार वाहानं धावतात. मात्र आता या महामार्गाचा वापर वाढू लागला असून यावर वाहानांची वर्दळ वाढू लागली आहे. तसेच, अनेकदा या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडीही पाहायला मिळते. याच सर्व अडचणींवर तोडगा म्हणून आता रस्ते विकास महामंडळानं मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आठ पदरी करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. 

मुंबई पुणे द्रुतगतीमार्ग देशामधील सर्वात पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग आहे. 2002 साली बांधून पूर्ण झालेला हा 94.5 किमी लांबीचा गतिमार्ग मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दोन शहरांना जोडतो. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या या मार्गामुळे सुसाट वेगानं प्रवास करण्याची ओळख नागरिकांना झाली. सध्या हा भारतामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे हा 148 किमी लांबीचा प्रवास 4-5 तासांवरून 2 तासांवर आला. मुंबई-पुणे प्रवास करणारी बहुतांश खाजगी वाहनं, एस.टी. बसेस, खाजगी परिवहन बसेस तसेच मालवाहू वाहनं एक्सप्रेसवेचा वापर करतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget