एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई पोलिसांकडून नोएडातील बोगस कॉलसेंटरचा पर्दाफाश
बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून देशभरातील तरुण तरुणींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.
मुंबई | बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून देशभरातील तरुण तरुणींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. संपूर्ण देशभरात मॉनस्टर डॉट कॉम व शाईन डॉट कॉम" या नोकरीसंबंधी वेबसाईटवरुन बेरोजगार तरुण-तरुणींचा वैयक्तिक चोरला जायचा.
एचडीएफसी, एक्सिस, आयसीआयसीआय व इतर बँकांमध्ये नोकरीचे अमिष दाखवलं जायचं. त्यांचे सिलेक्शन झाल्याचं बँकेचे बनावट कन्फर्मेशन लेटर तयार करुन मेलद्वारे पाठवायचे. यानंतर बेरोजगार तरुण-तरुणींना फोन करुन विविध बँक अकाऊंटमध्ये पैसे भरण्यास सांगून त्यांची फसवणूक केली जायची.
यासंबंधी मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात 2017 साली गुन्हा दाखल झाला होता. यात आरोपी देवरुषी अशोककुमार शर्मा, विक्रांत भूषण गिरी, जयदीप श्रीपूर्णांनंद शास्त्री, शशांक रामप्रकाश दुबे, सोनल अलमसिंग राणा, मनोज मोहनमहेश तिवारी या आरोपींना यूपीतील नोएडामधून अटक करण्यात आली आहे.
कॉलसेंटरचा संचालक ऑल इंडिया नेटवर्किंग फॅकल्टी आयकॉन प्रा. लि. या नावाने कंपनी चालवत होता. त्याला मॉनस्टरमध्ये काम करणारा सोनल अलमसिंग राणा आणि शाईनमध्ये काम करणारा मनोज तिवारी मदत करत होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 16 लॅपटॉप, 4 हार्डडिस्क, 16 मोबाईल फोन, 1 वायफाय किट, 10 सिमकार्ड, 09 सिमकार्ड कव्हर इतके साहित्य सापडले आहे. त्याचबरोबर तरुण तरुणींना फोन करून त्यांच्याशी कसे बोलायचे आणि रक्कम कशी मागायची याबद्दलच प्रशिक्षण असलेल्या डायऱ्या मिळाल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement