(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मध्य, हार्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द, पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक कायम
मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर आणि हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र रेल्वे प्रशासनाने तो रद्द करण्यात आला आहे.
मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र मध्य रेल्वेवरील कालपासून बंद असलेली बदलापूर ते कर्जत ही सेवा अद्यापही बंद आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही वाहतूक आज बंद ठेवण्यात आली आहे. सीएसएमटी ते बदलापूर ही सेवा सुरळीत सुरु आहे.
वांगणी येथे शुक्रवारी रात्रीपासून अडकलेली महालक्ष्मी एक्स्प्रेसही हटवण्यात आली आहे. रेल्वे रुळावर पाणी आल्यानं ही गाडी वांगणीजवळ थाबंवण्यात आली होती. रुळावरील पाणी कमी झाल्यानंतर आज महालक्ष्मी एक्स्प्रेस तेथून हटवण्यात आली आहे.
मध्य आणि हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द
मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर आणि हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र रेल्वे प्रशासनाने तो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला होता. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. त्यात आज मेगाब्लॉक घेतल्याने प्रवाशांना आणखी मनस्ताप सहन करावा लागला असता. हीच बाब लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असावा.
पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक कामय
पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते वसई रोडदरम्यान अप व डाऊन जलद मार्ग मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकमुळे अप जलद रेल्वे विरार, वसई रोड ते भाईंदर, बोरिवलीदरम्यान अप धिम्या मार्गावर, तर डाऊन जलद गाड्या बोरिवली ते वसई रोड, विरारदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर धावतील.
VIDEO | आपत्ती निवारणाची ऐशीतैशी, वांगणीजवळ अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया