मुंबई गोवा महामार्गाची दूरवस्था 'माझा'नं दाखवल्यानंतर सरकारला जाग! मंत्री चव्हाण पाहणी दौऱ्यावर, खड्डे भरणीला सुरूवात
एबीपी माझानं रस्त्यांची दूरवस्था झाल्यासंदर्भात स्पेशल रिपोर्ट केल्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे आज मुंबई गोवा हायवेच्या (Mumbai Goa high way) पाहणी दौऱ्यावर आहेत.

Mumbai-Goa Highway Potholes : गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेश उत्सवात कोकणात (Konkan) जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. परंतु कोकणात जाताना चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरुन (Mumbai-Goa Highway) खडतर प्रवास करावा लागतो. कारण रस्त्यावरील खड्डे (Potholes) आणि महामार्गाचं चौपदीकरण. परंतु कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास कमी खडतर आणि सुखकर व्हावा यासाठी आता मुंबई-गोवा हायवेवरील डागडुजीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आ
एबीपी माझानं रस्त्यांची दूरवस्था झाल्यासंदर्भात स्पेशल रिपोर्ट केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे आज मुंबई गोवा हायवेच्या (Mumbai Goa high way) पाहणी दौऱ्यावर आहेत. पनवेलनजीकच्या पळस्पे येथून हा दौरा सुरू झाला आहे. एबीपी माझानं या महामार्गावरील दूरवस्थेवर केलेल्या विशेष रिपोर्टनंतर लागलीच मंत्री महोदयांनी हा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यादरम्यान ते या संपूर्ण महामार्गावरील कामाची पाहणी करणार आहेत. रवींद्र चव्हाण यांनी स्वत: कामगारांना सूचना देत मुंबई गोवा महामार्गावर खड्डे भरणीला सुरूवात केली आहे.
गेली 11 वर्ष या महामार्गाचं काम रखडलं आहे. तसेच साल 2018 पासून मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिकाही प्रलंबित आहे. यादरम्यान सरकारं बदलली, मंत्री बदलले पण रस्त्याची दुरावस्था जैसे थेच आहे. अशातच एबीपी माझानं या महामार्गाची दुरावस्था दाखवताच खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी महामार्गाचा तातडीचा पाहाणी दौरा आज हाती घेतला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील रायगडच्या पहिल्या टप्यातील काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. पळस्पे ते इंदापूर या पट्यात रस्त्याची अक्षरश: चाळण झालीय. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्वसाच्या काळात इथं दर आठवड्याला खड्डे भरणी करावी लागते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ती आधुनिक पद्धतीनं सुरू आहे, मात्र जोपर्यंत कोर्टाल प्रलंबित असलेलं कल्याण टोलवेजचं प्रकरण निकाली निघत नाही, जमीनीचं अधिग्रहण पूर्ण होत नाही तोपर्यंत हे चौपदरी करणाचं काम सुरू होऊ शकत नाही, अशी कबुली प्रकल्प संचालकांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. मात्र नव्या सरकारनं हे काम आता मनावर घेतलंय, त्यामुळे सप्टेंबरपर्यंत इथल्या कामाला सुरूवात होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
गणेशोत्सवानिमित्त Mumbai -Goa Highway वरील अवजड वाहतुकीवर निर्बंध, 27 ते 31 ऑगस्ट दरम्यान वाहतूक बंद
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
