Mumbai Crime News : 8 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी भाच्याची योजना, प्रेयसीच्या मदतीने केली मामाच्या घरात चोरी
Mumbai Crime News: लोन ॲपवर झालेलं 8 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी मिरा रोडमध्ये (Mira Road Mumbai) एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या मदतीने चक्क मामाच्याच घरात चोरी केली आहे.
Mumbai Crime News: लोन ॲपवर झालेलं 8 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी मिरा रोडमध्ये (Mira Road Mumbai) एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या मदतीने चक्क मामाच्याच घरात चोरी केली आहे. प्रेयसी आणि एका नातेवाईकाच्या मदतीने मामाच्या घरात शिरून नकली बंदुकीच्या सहाय्याने धाक दाखवून हे धाडस त्यांनी केलं आहे. यात प्रकरणात तब्बल 10 लाख रुपयांची रोकड त्यांनी लंपास केली आहे. मात्र हा संपूर्ण प्रकार उजेडात येताच, काशिगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून यातील तरुणासह इतर तिघांना अटक केली आहे. मात्र या धाडसी चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अवघ्या 5 मिनिटात हा लुटीचा थरार, 10 लाखांची रोकड लंपास
मुंबईच्या मिरा रोड पूर्वेच्या काशिगाव येथील जनता नगरमध्ये मोहम्मद आदिल अहमद (वय 29 वर्ष) पत्नी आणि दोन भावांसह राहतात. त्यांची अमूल दुधाची एजन्सी आहे. कंपनीकडून दूध विकत घेऊन वितरीत करण्याचे काम ते करतात. आदिल हे अपंग असल्याने ते वितरणासाठी जात नाहीत. दरम्यान, सोमवारी सकाळी 4च्या सुमारास आदिल यांचे दोन्ही भाऊ दूध वितरणासाठी गेले होते. त्यावेळी आदिल आणि त्यांची पत्नी घरात एकटी होती. यावेळी अचानक दार उघडून तीन अनोळखी इसम घरात शिरले. त्यांनी बुरखा घातला होता. त्यामध्ये एक महिला होती. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून आदिल आणि त्यांच्या पत्नीला बांधले. यावेळी घरात असलेली 10 लाख रूपयांची रोकड घेऊन त्यांनी पळ काढला. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 5 मिनिटात हा लुटीचा थरार घडला होता.
अवघ्या 36 तासात पोलिसांकडून आरोपीला बेड्या
परिणामी, हा संपूर्ण प्रकार उजेडात येताच या जबरी चोरीचा तपास करण्यासाठी काशिगाव पोलिसांनी पथके तयार केली. त्यानंतर सीसीटीव्हीवरून आरोपीचा माग काढण्यात आला आणि अवघ्या 36 तासात काशिगांव पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. मात्र आरोपीला सत्य कळल्यावर पोलिसांनाच धक्का बसला. कारण आरोपी हा फिर्यादी याचा भाचा निघाला. त्याने आपल्या प्रेयसी आणि आणि काकाच्या मदतीने ही लुटीची योजना बनवली होती.
खेळण्यातील बंदुकाने लुटीचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी जुबेर फुरखान शेख (वय २१) याने एका लोन ॲप वर कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम ८ लाखांवर गेली होती. त्यामुळे त्याला धमक्या मिळत होत्या. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने मामालाच लुटण्याची योजना बनवली होती. मामाच्या घरात सकाळी रोख रक्कम जमा होते, हे त्याला माहिती होते. त्यासाठी त्याने खेळण्यातील बंदुक घेतली. त्याच्यासोबत त्याची प्रेयसी इकरार (वय २१) आणि काका कामरान शेख यांना सामिल केलं. त्यांची योजना यशस्वी झाली खरी. परंतु काशिगाव पोलिसांनी तत्परतेने तपास करून अवघ्या ३६ तासात आरोपींना बेड्या ठोकल्या.
इतर महत्वाच्या बातम्या