एक्स्प्लोर

भाजपसह राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत, दानवे-मेहता रडारवर

आधी दानवेंनी शेतकऱ्यांबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर लक्ष्मीदर्शन घेण्याचा सल्ला आणि आता थकवलेलं वीज बिल. त्यामुळे त्यांच्या गच्छंतीची दाट शक्यता मानली जात आहे.

मुंबई/नवी दिल्ली : गोपाळकाला अर्थात दहीहंडीच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळातल्या खांदेपालटाची जोरदार चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि वाचाळवीर म्हणून ज्यांच्यावर टीका झाली ते रावसाहेब दानवे यांच्यासह काही अतिकार्यक्षम तर काही अकार्यक्षम मंत्र्यांची हंडी फुटणार हे नक्की झालं आहे. रावसाहेब दानवे.. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष.. अपेक्षा अशी होती की यांनी पक्षाचं काम वाढवून सरकारचं काम सोपं करावं.. पण यांच्या वर्ल्ड फेमस वादग्रस्त विधानांमुळे सरकारला यांच्या बचावासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे दानवेंचा पर्याय शोधण्याची तयारी केंद्रीय नेतृत्वानं केल्याची माहिती आहे. रावसाहेब दानवे भाजपचा मराठा चेहरा आहेत. त्यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा देऊन केंद्रीय नेतृत्वानं सोशल इंजिनियरींगचा प्रयोग केला. मात्र दानवेंनी वेळोवेळी वादग्रस्त विधानं करुन पक्षालाच अडचणीत आणलं. शिवाय निर्णय प्रक्रियेत मुख्यमंत्र्यांचं डॉमिनेशन पाहता दानवे काय करतात? असा प्रश्न आहे. किमान सरकार आणि पक्षाची अडचण दूर व्हावी, असा त्यामागचा हेतू आहे. मात्र आधी दानवेंनी शेतकऱ्यांबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर लक्ष्मीदर्शन घेण्याचा सल्ला आणि आता थकवलेलं वीज बिल. त्यामुळे त्यांच्या गच्छंतीची दाट शक्यता मानली जात आहे. आता मुख्यमंत्र्यांनाच सुळावर चढवण्याची तयारी करणारा चेहरा म्हणजे प्रकाश मेहता. एमपी मिल कंपाऊंडचा एफएसआय खासगी बिल्डरच्या घशात घालण्यासाठी यांनी फाईलवर थेट मुख्यमंत्र्यांचं नाव वापरण्याची कमाल केली. मेहतांच्या कबुलीमुळे त्यांचा हेतू स्वच्छ आणि पारदर्शी नव्हता, यावर शिक्कामोर्तब झालं. मारुतीच्या शेपटीपेक्षा जास्त लांब असलेली एसआरए घोटाळ्याची मालिका मुख्यमंत्र्यांसाठी अडचणीची ठरु लागली आहे.  शिवाय मेहतांना हटवलं नाही, तर खडसेंवर अन्याय झाल्याची भावना एका समाजात बळावू शकते आणि सरकार बिल्डरधार्जिणं असल्याचा प्रचारही वाढू शकतो. त्यामुळे मेहतांना विश्रांती देण्याची सक्ती होणार आहे. विष्णू सावरा.. राज्याचे आदिवासी विकासमंत्री.. पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. एप्रिल 2016 पासून तब्बल 600 आदिवासी मुलं दगावली. देशभर राज्याची बेअब्रू झाली. त्यामुळे सावरांच्या कारभारावर मुख्यमंत्री नाखुश आहेत. त्यामुळे सावरांना आपला कारभार आवरावा लागणार आहे. दिवाळीत फडणवीस सरकार 3 वर्षांचं होईल. लोकसभेसोबत विधानसभा झाली तर फक्त दीड वर्ष हातात आहे. अशावेळी दानवे, मेहता, सावरा, देसाईंसारख्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून मतदारांना सामोरं जाणं लज्जास्पद ठरु शकतं. त्यामुळे मंत्र्यांच्या इमेज मेकओव्हरपेक्षा मंत्री बदलणं जास्त सोपं आहे. ज्याची झलक महिन्याभरात दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget