एक्स्प्लोर

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीची हंगामी भाडेवाढ

ही भाडेवाढ 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत वैध असेल. गेल्या तीन वर्षांपासून एसटी दिवाळीच्या काळात हंगामी भाडेवाढ करते.

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळानं 10 टक्क्यांची हंगामी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या तसंच फिरण्याचे बेत आखणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. आज शनिवारी मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू असेल. यात साध्या बससाठी 10 टक्के, निमआराम म्हणजेच शिवनेरी बससाठी 15 टक्के आणि शिवशाही बससाठी 20 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत वैध असेल. गेल्या तीन वर्षांपासून एसटी दिवाळीच्या काळात हंगामी भाडेवाढ करते. खासगी बसचालकांची मनमानी दिवाळी तोंडावर आली असताना दरवर्षीप्रमाणे खासगी ट्रॅव्हल्सनी प्रवाशांचं दिवाळं काढायला सुरूवात केली आहे. मुंबईसह पुण्यापासून राज्यातल्या प्रमुख शहरांत जाणाऱ्या बससेवेचे दर जवळपास दुपटीनं वाढवण्यात आले आहेत. दिवाळीच्या सुट्टीत अनेक जण आपल्या गावाला किंवा फिरण्यासाठी जातात. रेल्वेचं रिझर्व्हेशन फुल्ल असल्यामुळे अनेकजण खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडतात. मात्र याचाच गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवाशांचा किसा कापायला सुरूवात केली आहे. खालील साधारण दर, वाढीव दर स्लीपर बस मुंबई ते औरंगाबाद - साधारण दर 700 रुपये, वाढीव दर 1200 रुपये मुंबई ते रत्नागिरी - साधारण दर600 रुपये, वाढीव दर 1200रुपये मुंबई ते सोलापूर -साधारण दर600, वाढीव दर 1000रुपये मुंबई ते कोल्हापूर -साधारण दर 600 रुपये , वाढीव दर 1000 रुपये मुंबई ते नागपूर - साधारण दर 1500रुपये, वाढीव दर  3200 रुपये मुंबई ते लातूर - साधारण दर 800 रुपये , वाढीव दर 1500 रुपये मुंबई ते गोवा   - साधारण दर   800 रुपये ,वाढीव दर-  1500 एसी स्लीपर मुंबई ते हैद्राबाद , बंगलोर - साधारण दर1500 रुपये, वाढीव दर 2200 रुपये खरंतर सर्व व्यवहार ऑनलाइन झाल्याने तसं म्हंटल तर एजंटकडून प्रवाशांना लुबाडणं कमी झालं आहे. कारण ऑनलाइन दरानेच तिकीट विक्री केली जाते. मात्र, तिकिट विक्री होणाऱ्या ऑनलाइन साईट्सवरच हे दर 30 ते 50 % ने या दिवाळीच्या दिवसात वाढविण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget