Excise Sub Inspector : राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदासाठी जाहिरात, कुणाला अर्ज करता येणार?
MPSC Excise Sub Inspector : राज्य उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षक पदासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची माहिती एमपीएससीने वेबसाईटवर दिली आहे.

मुंबई : एमपीएससीने राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदाच्या 137 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही पदभरती असून त्यासाठी अर्हता एमपीएससीने वेबसाईटवर जाहीर केली आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाच्या अधिनस्त राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग आणि जवान संवर्गातील कर्मचाऱ्यांना दुय्यम निरीक्षक, गट क पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा मुंबई केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेची दिनांक ही स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलं आहे.
MPSC Excise Sub Inspector Advertisement : या परीक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती
- अर्ज सादर करण्याचा कालावधी - 10 जून ते 30 जून
- ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख - 30 जून रात्री 11.59 मिनिटे
- चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख - 3 जुलै
- एकूण पदसंख्या - 137
- त्यामध्ये जवान संवर्गासाठी 115 पदे तर लिपिक संवर्गासाठी 22 पदे
- यापैकी दिव्यांग प्रवर्गासाठी एकूण सहा पदे
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असलेल्या उमेदवारासाठी 3 वर्षाची नियमित सेवा तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यासाठी 5 वर्षांची नियमित सेवा पूर्ण असणे बंधनकारक आहे.
जा. क्र. ११२/२०२५ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 9, 2025
एकूण पदसंख्या : १३७
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :३० जून २०२५ https://t.co/Nj3rJcWkhc
State Excise SI Exam : परीक्षा कशी असणार?
या परीक्षेसाठी एकच टप्पा असणार आहे. त्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा घेण्यात येणार आहे. 200 गुणांसाठी असलेल्या या परीक्षेसाठी दोन पेपर घेण्यात येणार आहेत.
लेखी परीक्षेतील अंतिम गुणांच्या आधारे उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
ही बातमी वाचा:





















