एक्स्प्लोर

Pune MPSC tution Class: स्पर्धा परीक्षांचे नियमबाह्य क्लास पोलिसांच्या रडारवर; कठोर कारवाईचा पोलिस आयुक्तांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?

Pune MPSC tution Class: महापालिका प्रशासनाची परवानगी, तसेच अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता न करता क्लास सुरु असेल तर थेट पोलीस आयुक्त कारवाई करणार असल्याची माहिती आहे.

पुणे: स्पर्धा परीक्षेचे बेकायदा क्लास चालविणाऱ्यांवर आता पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे. बेकायदा वर्ग चालवल्यास कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून देण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी मध्यरात्री अलका चौकात, फारसखाना पोलीस ठाण्याच्या आवारात विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन क्लास चालकांनाच भोवणार असल्याचं दिसून येत आहे. आंदोलन करण्यास काही स्पर्धा परीक्षा वर्गचालक विद्यार्थ्यांना प्रवृत्त करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या क्लास चालकाची बैठक घेतली आणि त्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. महापालिका प्रशासनाची परवानगी, तसेच अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता न करता क्लास सुरु असेल तर थेट पोलीस आयुक्त कारवाई करणार असल्याची माहिती आहे. 

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस आयुक्तालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग चालकांची बैठक आयोजित करण्यात आली. परीक्षा पद्धती, अभ्यासक्रमातील बदलांसह विविध मागण्यांसाठी यापूर्वी विद्यार्थ्यांकडून आंदोलने करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी चार दिवसांपूर्वी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलन केले. ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही आंदोलने करण्यास काही स्पर्धा परीक्षा वर्गचालक, तसेच अभ्यासिका चालक विद्यार्थ्यांना प्रवृत्त करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यावरून पोलिसांनी बैठक बोलवून इशारा दिला आहे.

 पुण्यातील मध्यवर्ती भागात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना कोचिंग क्लास चालकांकडून धडे दिले जातात. प्रत्यक्षात मात्र, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बहुतांश क्लास चालकांकडून चक्क विद्यार्थ्यांनाच आंदोलन करण्यासाठी पुढे केले जात आहे असल्याची पोलिसांची माहिती आहे. परीक्षा पुढे ढकला, एमपीएससी, यूपीएससी आयोगाच्या विविध धोरणात्मक निर्णयाबाबत टीका करण्यास भाग पाडले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांकडून वारंवार आंदोलन करत नागरिकांसह पोलिसांना वेठीस धरले जात आहे. त्याबरोबरच स्पर्धा परीक्षेशी काही संबंध नसताना देखील काही जण आंदोलन भडकवत आहे. त्यामुळे आंदोलन भडकवणारेही यानिमित्ताने रडारवर आले आहेत.

पोलिस आयुकत काय म्हणाले?

पुण्यातील काही स्पर्धा परीक्षा क्लास चालकांकडून विविध नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता न घेणे, अग्निशमक दल, महापालिका, स्थानिक पोलिसांची परवानगी नसणे, यासह विविध परवानगीची तपासणी मोहीम आम्ही सुरू केली आहे. नियमबाह्य क्लासचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती  पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. 

 

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SRPF Exam Cancelled : राज्य राखीव पोलीस दलाची परीक्षा अखेर रद्द, 100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून आल्यानंतर मोठी कारवाई
राज्य राखीव पोलीस दलाची परीक्षा अखेर रद्द, 100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून आल्यानंतर मोठी कारवाई
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
NEET Exam Paper Leak: आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
Pune Crime News: पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये धक्कादायक घटना, पार्टी संपल्यावर घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये नेलं अन् महिलेसोबत नको ते केलं
पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये धक्कादायक घटना, पार्टी संपल्यावर घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये नेलं अन् महिलेसोबत नको ते केलं

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Embed widget