एक्स्प्लोर

MPSC : ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध; तीन वर्षाच्या अनुभवाची जाचक अट लागू, विद्यार्थ्यांमध्ये रोष

एमपीएससीने ड्रग इन्स्पेक्टरसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यामध्ये तीन वर्षाच्या अनुभवाची अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष दिसून येत आहे.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने(MPSC) नुकतीच ड्रग इन्स्पेक्टर (Drug Inspector) या पदासाठी  87 जागांची  जाहिरात प्रसिद्ध केली आहे.  परंतु या पदासाठी अर्ज करताना तीन वर्षाच्या अनुभवाची जाचक अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षे अभ्यास करणारे विद्यार्थी यासाठी पात्र ठरणार नाहीत. एमपीएससीच्या या निर्णयामुळे या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. 

ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी एमपीएससीने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पण यासाठी तीन वर्षाच्या अनुभवाची अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे या परीक्षेची गेली अनेक वर्षे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. एमपीएसचीच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी अर्ज करण्यासाठी 8 डिसेंबर 2021 ही शेवटची तारीख आहे. या परीक्षेसाठी बी. फार्मसी केलेले विद्यार्थी पात्र असतात. 

एमपीएसचीच्या या निर्णयाविरोधात आता विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक पत्र लिहिले आहे. एमपीएससीने ही जाचक अट जर मागे घेतली नाही तर राज्यभर ठिकठिकाणी विद्यार्थ्यांकडून आंदोनल करण्यात येईल असा इशारा विद्यार्थी संघटनांकडून देण्यात आला आहे. 

 नुकतेच पदवी  फार्मसी झालेले विद्यार्थी रोजगाराच्या शोधत असताना मग तीन वर्ष अनुभव घेतलेले आर्थिक सक्षम  किंवा स्थिर लोकांना सेवेत घेऊन काय साध्य  होणार आहे असा सवाल विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. जर अनुभवाची अट  ठेवायची असेल तर इतर राज्यसेवा परीक्षांसारखा प्रोबेशनरी पिरेड ठेवावा अशीही मागणी करण्यात येत आहे. एमपीएससीने बी.फार्मसी पदवीला प्रोफेशनल पदवी म्हणून मान्यता द्यावी आणि फॉरेस्ट ऑफिसर तसेच महिला बालविकास अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या समकक्ष पदासाठी सुद्धा पात्र करावं अशी मागणीही विद्यार्थ्याकडून केली जात आहे. 

सरसकट सर्व पदवी फार्मसी विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी द्यावी, सेवा प्रवेश नियमामध्ये तातडीने बदल करावे आणि हजारो विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे. अन्यथा प्रशासनाला संबंधित विद्यार्थ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. 

UPSC ने अनुभवाची अट काढून टाकली
निधी पांडे विरुद्ध संघ लोकसेवा आयोग या खटल्यामध्ये CAT ने  ड्रग अँड कॉस्मेटिक अॅक्ट 1945 च्या नियम 49 नुसार असे सांगितले की या परीक्षेसाठी अनुभवाची अट नियुक्तीनंतर लागू होते. यावर दिल्ली, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान आणि सिक्कीम या राज्यांमध्ये अनुभवाची अट शिथिल करण्यात आली आहे. याच धरतीवर संघ लोकसेवा आयोगानेही (UPSC) ही अट काढून टाकली आहे. 

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Madha Lok Sabha : भाजपला माढ्यात मोठा धक्का! मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्रRohit Pawar on Sujay Vikhe : नगरमध्येही जले जावो होणार! रोहित पवार यांचा थेट सुजय विखेंवर हल्लाबोलPrakash Ambedkar : दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्यSharad Pawar : 14 ते 24 हे सत्तेत मंत्री होते, हिशेब मला विचारतात...पवारांचा शाहांवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
Embed widget