एक्स्प्लोर
खा. गायकवाड दिल्लीत दाखल, लोकसभेत बाजू मांडणार
नवी दिल्ली : शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड दिल्लीत दाखल झाले आहेत. उद्या लोकसभेत ते आपली बाजू मांडतील. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर त्यांना विमान कंपन्यांनी काळ्या यादीत टाकलं होतं. त्यानंतर जवळपास 10 दिवसांनी खासदार गायकवाड दिल्लीत दाखल झाले आहेत.
रवींद्र गायकवाड हे चार्टर्ड विमानाने दिल्लीला आले असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. मात्र ते दिल्लीत कसे आले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
काही चूक झाली असेल, तर सभागृहाची माफी मागेल, मात्र एअर इंडियाची माफी मागणार नाही, अशी भूमिक रवींद्र गायकवाड यांनी घेतल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला.
विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे.
‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली.
भारतीय विमान संघाची बंदी
भारतीय विमान संघानं गायकवाडांवर बंदी घातली आहे. जवळपास भारतातील सर्व विमान कंपन्यांनी गायकवाडांवर बंदी घातली आहे. भारतीय विमान संघामध्ये गोएअर, जेट एअरवेज, जेटलाईट, इंडिगो यासारख्या प्रमुख विमान कंपन्यांचा समावेश आहे.
कोण आहेत रवींद्र गायकवाड?
– रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत
– लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.
– उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचित आहेत
– रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते.
– दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे.
– तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला.
संबंधित बातम्या :
एअर इंडियाने खा. गायकवाड यांचं तिकीट पुन्हा रद्द केलं!
ना विमान, ना रेल्वे, आता रस्ते मार्गे खा. गायकवाड दिल्लीकडे
VIDEO: खा. रवींद्र गायकवाडांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद
प्रत्यक्षदर्शी एअर होस्टेस खासदार रवींद्र गायकवाड यांच्या बाजूने
कपिल शर्मावर बंदी नाही, मग खा. गायकवाडांवर का?: खा. अडसूळ
खा. रवींद्र गायकवाड गायबच, शिवसैनिकांची उस्मानाबाद बंदची हाक
खा. रवींद्र गायकवाड यांचं लेखी स्पष्टीकरण
पुन्हा त्याच विमानाने जाणार, एअर इंडियाने अडवून दाखवावं : गायकवाड
… म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement