(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अयोध्येत ठाकरे कुटुंबीयांना नव्हे तर फक्त राज ठाकरेंना विरोध, खासदार बृजभूषण सिंह यांचं वक्तव्य
राज ठाकरे या एकमेव व्यक्तीचा अपवाद वगळला तर ठाकरे कुटुंबीयांपैकी कुणाच्याही अयोध्या दौऱ्याला आपला विरोध नसल्याचं बृजभूषण यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं स्वागत केलं आहे. बृजभूषण सिंह यांनी अयोध्येतल्या शरयू तीरावरच्या नया घाटावर बृजभूषण यांनी एबीपी माझाला खास मुलाखत दिली. राज ठाकरे या एकमेव व्यक्तीचा अपवाद वगळला तर ठाकरे कुटुंबीयांपैकी कुणाच्याही अयोध्या दौऱ्याला आपला विरोध नसल्याचं बृजभूषण यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं.
बृजभूषण सिंह म्हणाले, महाराष्ट्रतील लोकांशी आमच्या उत्तर भारतीय, अयोध्या वासीयांचा कोणताही शत्रुत्व नाही. आमचे शत्रुत्व हे फक्त राज ठाकरेंशी आहे. कारण त्यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केले आहे. राज ठाकरे या एकमेव व्यक्तीचा अपवाद वगळला तर ठाकरे कुटुंबीयांपैकी कुणाच्याही अयोध्या दौऱ्याला आपला विरोध नाही. जर राज ठाकरे यांचा कुटुंब त्यांची आई, मुलगा कोणीही येऊ देत त्यांचा स्वागत आदरातिथ्य माझ्या घरी करेल पण राज ठाकरेंना विरोध राहणार आहे.
राज ठाकरेंकडी मी खूप मोठी गोष्ट मागितली नव्हती मी फक्त माफी मागा आणि अयोध्येय या असे म्हटलं होते. राज ठाकरे यांनी अयोध्येचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. आम्ही पण विरोधाचा आमचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी या वेळी दिला.
शरद पवार आणि माझे संबंध खूप चांगले आहेत. मी त्यांचा खूप आदर करतो. जे शरद पवार यांचं नाव घेऊन आरोप करतात त्यांचे विचार खालच्या पातळीचे आहेत. ते बृजभूषण सिं ला ओळखत नाहीत. आदित्य ठाकरे येत असतील तर त्यांना विरोध करणार नाही. त्यांना ज्या मंदिरात त्यांना जायचं आहे त्या मंदिरात ते जातील.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच त्यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध केला होता.