एक्स्प्लोर
आमदार रवी राणांविरोधात खा. अडसूळांची दुसऱ्यांदा अॅट्रॉसिटीची तक्रार
आमदार रवी राणा यांनी सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत, अडसूळ यांनी ही तक्रार दिली होती. त्यानंतर काल पुन्हा खासदार अडसूळ यांनी रवी राणांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे.
![आमदार रवी राणांविरोधात खा. अडसूळांची दुसऱ्यांदा अॅट्रॉसिटीची तक्रार MP Anandrao Adsul again file atrocity case against mla ravi rana आमदार रवी राणांविरोधात खा. अडसूळांची दुसऱ्यांदा अॅट्रॉसिटीची तक्रार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/22151742/Ravi-Rana-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अमरावती: बडनेऱ्याचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याविरोधात एका आठवड्यात दुसऱ्यांदा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी रवी राणांविरोधात तक्रार दाखल केली होती.
आमदार रवी राणा यांनी सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत, अडसूळ यांनी ही तक्रार दिली होती. त्यानंतर काल पुन्हा खासदार अडसूळ यांनी रवी राणांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे.
मुंबई येथील सिटी बँकमध्ये 900 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करुन, रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर खोटे मेसेज प्रसारित केल्याचा आरोप खासदार अडसूळ यांनी केला. त्यामुळे रवी राणांविरोधात आपण 800 कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं अडसूळ यांनी म्हटलं आहे.
रवी राणा यांचा आरोप काय?
खासदार आनंदराव अडसूळ हे मुंबईतील सिटी बँकेचे अध्यक्ष आहेत. मात्र अडसूळ आणि त्यांचे स्वीय सहाय्यक सुनील भालेराव यांनी पदाचा गैरवापर करत, सीटी बँकेत 900 कोटींचा घोटाळा केला आणि बेहिशेबी संपत्ती जमवली, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला.
इतकंच नाही तर खासदार अडसूळ यांनी गोरगरीब जनता, पेन्शनधारकांचे पैसे लाटल्याची पोस्ट रवी राणा यांनी सोशल मीडियावर केली होती.
खासदार अडसूळ यांचा दावा
रवी राणा यांनी सोशल मीडियावर आरोप करुन बदनामी केली. मात्र रवी राणा यांनी याबाबतची कोणतीही तक्रार पोलिस स्टेशन किंवा संबंधित विभागाकडे केली नाही. आपण अनुसूचित जाती, जमातीचे सदस्य आहोत. त्यामुळे रवी राणा यांनी जाणीवपूर्वक आपली बदनामी केली, असा दावा खासदार अडसूळ यांनी केला आणि रवी राणांविरोधात अट्रोसिटीची तक्रार दाखल केली.
संबंधित बातम्या
खा. अडसूळांची तक्रार, आ. रवी राणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा
अॅट्रॉसिटीबाबत कोर्टाच्या निर्णयाने काय बदललं आणि सरकार काय करतंय?
अॅट्रॉसिटी कायद्यातील जुन्या तरतुदी कायम राहणार, कॅबिनेटचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)