एक्स्प्लोर

तरुणीकडून आईचं व्हॉट्सअॅप हॅक, प्रेमसंबंध उघडकीस आणून आईच्या प्रियकराचं ब्लॅकमेलिंग, तरुणीसह तिच्या प्रियकराला बेड्या

Pune : 21 वर्षीय तरुणीने स्वतःच्या आईचं व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक करून एका पुरुषासोबत असणारे प्रेमसंबंध तिने उघडकीस आणले. त्यानंतर आईच्या प्रियकराला ब्लॅकमेल करत त्याच्याकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितली

पुणे :  पुण्यातील 21 वर्षीय तरुणीने स्वतःच्या आईचं व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक करून एका पुरुषासोबत असणारे प्रेमसंबंध तिने उघडकीस आणले. त्यानंतर आईच्या प्रियकराला ब्लॅकमेल करत त्याच्याकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी सदर तरुणीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  

एका व्यक्तीचे स्वतःच्या आईसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा पर्दाफाश करण्यासाठी 21 वर्षीय तरुणीने आईचे व्हॉट्सअॅप हॅक केले. त्यातून तिने आई आणि तिच्या प्रियकराचे फोटो, व्हिडीओ मिळवले. हेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याचं धमकावत 15 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. खंडणीतील एक लाख रक्कम स्वीकारताना पोलिसांनी या तरुणीला आणि तिच्या प्रियकराला रंगेहात पकडले आणि दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.  मिथुन मोहन गायकवाड (वय 29) आणि एका 21 वर्षीय तरुणीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता आठ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

तक्रारदार व्यक्तीचे एका 40 वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या महिलेच्या मुलीला या दोघांवर संशय होता. या दोघांचं प्रेम प्रकरण उघडकीस आणण्यासाठी या मुलीने स्वतःच्या आईचा व्हाट्सअप हॅक केलं. त्यावेळी तिला या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. व्हॉट्सअॅप हे केल्यानंतर तिला काही फोटो आणि व्हिडिओ देखील मिळाले होते. हेच फोटो आणि व्हिडिओ तिने आपल्या प्रियकराला दाखवले. आणि त्यानंतर खंडणीचा प्रकार सुरु झाला. 

आरोपींनी तक्रारदाराला संपर्क साधून, दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून पंधरा लाख रुपये खंडणीची मागणी केली. तक्रारदाराने देखील त्यांच्या दबावाला बळी पडून दोन लाख 60 हजार रुपये इतकी रक्कम त्यांना वेळोवेळी दिली होती. परंतु आणखी पैशाची मागणी होत असल्याने त्याने पोलिसांना संपर्क साधला. उर्वरित पैसे घेण्यासाठी त्यांना बोलावून पोलिसांनी दगडूशेठ गणपती मंदिराजवळ सापळा रचला. पैसे घेण्यासाठी आलेल्या मिथुन गायकवाड याला 1 लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने प्रेयसीसोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget