एक्स्प्लोर
दोन महिन्यांच्या चिमुरडीची हत्या, अपहरण झाल्याचा आईचा बनाव
औरंगाबाद : जन्मदात्या मातेनंच अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुरडीची हत्या केल्याची घटना औरंगाबादेत समोर आली आहे. उपचारांचा खर्च परवडत नसल्याने महिलेने हे टोकाचं पाऊल उचललं.
औरंगाबाद शहरातल्या बालाजीनगरमध्ये राहणाऱ्या कल्याणी साळुंके या महिलेनं मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी घेतलेल्या जबाबात या महिलेचा खोटारडेपणा उघड झाला. अवघ्या दोन महिन्यांच्या या मुलीची तिच्या आईनंच हत्या केल्याचं उघड झालं.
दोन महिन्यांच्या मुलीला जन्मतःच एका गंभीर आजाराचं निदान झालं होतं. तिच्या डोळ्यातून सतत रक्तस्त्राव व्हायचा. त्यावरील उपचारांचा खर्च कल्याणीला झेपणारा नव्हता. त्यामुळे निराश होऊन आपण हे पाऊल उचलल्याचं तिनं सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement