एक्स्प्लोर

Morning Headlines 3rd February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

भाजपा आमदाराचा शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळीबार, गणपत गायकवाडसह तीन जण अटकेत

कल्याण:  उल्हासनगरमध्ये (UlhasNagar Crime)  भाजप आमदार गणपत गायकवाड  यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार  झाला आहे,  भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे गोळीबारप्रकरणी गणपत गायकवाडसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती मिळतेय. वाचा सविस्तर...

Ayodhya Ram Mandir : 11 दिवसात 11 कोटींचं दान! राम मंदिरात 25 लाख भाविक प्रभू रामाचरणी नतमस्तक

Ayodhya Ram Mandir Donation : 22 जानेवारीला मोठ्या उत्साहात राम मंदिरात (Ayodhya Ram Temple) प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) सोहळा पार पडला. यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. मोठ्या संख्येने भाविक राम मंदिरात (Ram Mandir) दाखल होत आहे. 22 जानेवारीला झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून गेल्या 11 दिवसांत सुमारे 25 लाख भाविकांनी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली. सुमारे 25 लाख भाविकांनी प्रभू रामाचं दर्शन घेतलं आहे. इतकंच नाही तर गेल्या 11 दिवसांत राम मंदिराला मोठी देणगीही मिळाली आहे. वाचा सविस्तर...

Arvind Kejriwal : केजरीवालांच्या घरी दिल्ली पोलिसांचं पथक, भाजपच्या तक्रारीनंतर क्राईम ब्रांचकडून चौकशी; नेमकं कारण काय?

Delhi Crime News : दिल्ली क्राईम ब्रांचचं (Delhi Crime Branch) पथक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचलं. दिल्लीतील सरकार (Delhi Government) पाडण्यासाठी भाजपने (BJP) आपचे (AAP) आमदार (MLA) फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी नुकताच केला होता. या संदर्भात दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी (Delhi Crime Branch) शुक्रवारी केजरीवाल यांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले, मात्र यावेळी केजरीवाल निवासस्थानी उपस्थित नव्हते. वाचा सविस्तर...

Foreign Currency : देशाच्या परकीय गंगाजळीत वाढ! परकीय चलनसाठ्यात 616.73 अब्ज डॉलरवर

RBI Data, India Forex Reserves : चलन बाजारात डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपया (Rupee) मजबूत झाला आहे. शुक्रवारी रुपया 6 पैशांनी मजबूत झाला आणि 82.92 च्या पातळीवर बंद झाला. गेल्या आठवड्याच्या घसरणीनंतर या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात (Foreign Currency Reserves) वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या घसरणीनंतर या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात (Foreign Currency) वाढ झाली आहे. बँकिंग क्षेत्र नियामक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) माहितीनुसार, 26 जानेवारी 2024 ला संपलेल्या आठवड्यात, परकीय चलन साठ्यात 591 दशलक्ष डॉलरने वाढ झाली आहे. यामुळे परकीय चलन साठा 616.733 अब्जांवर पोहोचला आहे. वाचा सविस्तर...

"हिमंत आणि मिलिंद देवरा यांच्यासारख्या नेत्यांनी काँग्रेस सोडावी"; राहुल गांधींचा काँग्रेस नेत्यांना सल्ला

Rahul Gandhi: नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वात सध्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) दुसरा टप्पा सुरू आहे. भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) सध्या पश्चिम बंगालमधून (West Bengal) जात आहे. यावेळी राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राहुल गांधी म्हणाले की, हिमंता बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरा यांसारख्या नेत्यांनी पक्षापासून वेगळं व्हावं, कारण ते पक्षाच्या विचारसरणीशी सहमत नाहीत. दरम्यान, हिमंता बिस्वा सरमा 2014 मध्ये भाजपमध्ये सामील झाले आणि आता ते आसामचे मुख्यमंत्री आहेत, तर मिलिंद देवरा यांनी गेल्या महिन्यातच काँग्रेसची साथ सोडत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. वाचा सविस्तर...

Weather Update : 'या' भागात पावसाची हजेरी, पुढील आठवड्यात हवामान कसं राहील? वाचा सविस्तर

Weather Update Today IMD Forecast : देशाच्या काही भागात पावसाची हजेरी (Rain Update) पाहायला मिळाली आहे. दिल्लीमध्ये शुक्रवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. दिल्लीच्या काही भागात खूप दाट धुके पाहायला मिळणार आहे. हरियाणा, राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा या वेगवेगळ्या भागात दाट धुके तर, पश्चिम बंगालच्या काही भागात मध्यम धुके पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, शुक्रवारी वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव कमी झाल्यामुळे हवामानावर परिणाम होणार नाही. त्यामुळे हवामानात कायम राहण्याचा अंदाज आहे. वाचा सविस्तर...

3rd February In History : विजेवरील पहिली लोकल मुंबईत धावली, प्रयाग कुंभ चेंगराचेंगरीत 500 जणांचा मृत्यू,; आज इतिहासात...

3rd February In History : इतिहासातील प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. प्रत्येक दिवसाचे इतिहासात एक महत्त्व असते. आज बनारस हिंदू विद्यापीठाचा स्थापना दिन आहे. आजच्या दिवशी 1954 मध्ये प्रयाग येथील कुंभमेळ्यात  झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 500 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. वाचा सविस्तर...

Horoscope Today 3 February 2024 : आजचा दिवस खास! 12 राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 3 February 2024 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 3 फेब्रुवारी 2024 रोजी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीच्या लोकांनी भूतकाळात काही महत्त्वाचे काम केले होते, त्याचे फळ त्यांना आज मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांना आज सहलीला जाण्याची संधी मिळाली तर मागे राहू नका. सर्व राशीच्या लोकांसाठी शनिवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...

युवा ब्रिगेडची घौडदौड सुरुच, नेपाळला 132 धावांनी हरवलं, उपांत्य फेरीत धडक

Indian Cricket Team In U19 World Cup 2024 : अंडर 19 विश्वचषकात भारतीय युवा (Team India) संघाची विजयी घौडदौड सुरुच आहे. सुपर 6 सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा 132 धावांनी (IND vs NEP) पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये (Semi Final) दिमाखात प्रवेश केलाय. उदय सहारनच्या (Uday Saharan) नेतृत्वातील भारतीय संघाने लागोपाठ पाचव्या विजयाची नोंद केली आहे. सुपर 6 च्या पहिल्या सामन्यात भारताच्या युवा ब्रिगेडने न्यूझीलंड संघाचा 214 धावांनी पराभव केला आहे. वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 26 March 2025Special Report | Santosh Deshmukh | मास्टरमाईंड हत्येचा वाल्मिक कराडच! खटला ट्रॅकवर, न्याय लवकर?Special Report|Opposition Leader | संपला कालावधी निवड कधी? विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्तच राहणार?Special Report | Kunal Kamra | गाण्यावरुन वादंग, कामरावर हक्कभंग; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी सभागृहात गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय, क्विंटन डी कॉकनं एकहाती विजय खेचून आणला, राजस्थाननं मॅच कुठं गमावली?
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
रिझर्व्ह बँकेचा HDFC सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड भरण्याचे आदेश, कारण समोर
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
Embed widget