एक्स्प्लोर

युवा ब्रिगेडची घौडदौड सुरुच, नेपाळला 132 धावांनी हरवलं, उपांत्य फेरीत धडक

Indian Cricket Team In U19 World Cup 2024 : अंडर 19 विश्वचषकात भारतीय युवा (Team India) संघाची विजयी घौडदौड सुरुच आहे. सुपर 6 सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा 132 धावांनी (IND vs NEP) पराभव केला.

Indian Cricket Team In U19 World Cup 2024 : अंडर 19 विश्वचषकात भारतीय युवा (Team India) संघाची विजयी घौडदौड सुरुच आहे. सुपर 6 सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा 132 धावांनी (IND vs NEP) पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये (Semi Final) दिमाखात प्रवेश केलाय. उदय सहारनच्या (Uday Saharan) नेतृत्वातील भारतीय संघाने लागोपाठ पाचव्या विजयाची नोंद केली आहे. सुपर 6 च्या पहिल्या सामन्यात भारताच्या युवा ब्रिगेडने न्यूझीलंड संघाचा 214 धावांनी पराभव केला आहे. 

सुपर 6 सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 विकेटच्या मोबदल्यात 297 धावांचा डोंगर उभारला. सचिन धस याने 116 धावांची खेळी केली. त्याशिवाय कर्णधार उदय सरहन यानेही शतक ठोकले. फलंदाजांनी चोख कामगिरी बजावल्यानंतर गोलंदाजांनीही आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली. गोलंदाजांनी नेपाळला 165 धावांपर्यंत रोखलं. सोम्य पांडे याने 29 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. त्याशिवाय अर्शिन कुलकर्णी याने दोन फलंदाजांना तंबूत पाठवले.  सचिन धस याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

आतापर्यंत टीम इंडियाचा प्रवास कसा राहिलाय ?

भारतीय युवा ब्रिगेडने विश्वचषकात आतापर्यंत शानदार कामगिरी केली. उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने आतापर्यंत एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. सलग पाच सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. युवा ब्रिगेडचा सामना आता दक्षिण आफ्रिका संघाविरोधात होणार आहे. भारतायी संघाने आतापर्यंत बांगलादेश, आयर्लंड, अमेरिका, न्यूझीलंड आणि नेपाळ संघाचा पराभव केला. भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये आता दक्षिण आफ्रिका संघाला रोखावं लागणार आहे. उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघापुढे हे तगडं आव्हान असेल. भारताच्या संघाने आतापर्यंत सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. 

उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने बांगलादेशविरात विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात केली होती. पहिल्याच सामन्यात युवा ब्रिगेडने 84 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा 201 धावांनी सुपडा साप केला. तिसऱ्या सामन्यात भारताने अमेरिकेला 201 धावांनी नमवलं. न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव करत टीम इंडियाने विजयाचा चौकार लगावला.  पाचव्या सामन्यात नेपाळचा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. भारतीय संघाने तीन सामने 200 पेक्षा जास्त धावांनी जिंकले आहेत. आता सेमीफायनलमध्ये भारताचा सामना यजमान दक्षिण आफ्रिकाविरोधात होणार आहे. यजमानांना रोखण्याचं भारतापुढे मोठं आव्हान असेल.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 1st T20I LIVE Score : टीम इंडियाने जिंकली नाणेफेक, वेस्ट इंडिजविरुद्ध श्रेयस अय्यरने घेतला धडकी भरवणारा निर्णय, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs WI LIVE : टीम इंडियाने जिंकली नाणेफेक, वेस्ट इंडिजविरुद्ध श्रेयस अय्यरने घेतला धडकी भरवणारा निर्णय, जाणून घ्या LIVE अपडेट
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
IND vs NZ Squads T20 Tour : 4 वर्षांनी वाघ आला! भुवनेश्वर कुमारचं दणक्यात कमबॅक; न्यूझीलंड दौऱ्यासाठी 16 जणांचा धडकी भरवणारा टीम इंडियाचा संघ जाहीर
4 वर्षांनी वाघ आला! भुवनेश्वर कुमारचं दणक्यात कमबॅक; न्यूझीलंड दौऱ्यासाठी 16 जणांचा धडकी भरवणारा टीम इंडियाचा संघ जाहीर
IND vs WI 1st T20 : भारत आणि वेस्ट इंडिज पहिल्या टी-20 सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! शिमरॉन हेटमायर थेट पंचाशीच भिडला, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
भारत आणि वेस्ट इंडिज पहिल्या टी-20 सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! शिमरॉन हेटमायर थेट पंचाशीच भिडला, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
Embed widget