एक्स्प्लोर

Morning Headlines 19th September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनात कामकाजाचा 'श्रीगणेशा'; सेंट्रल हॉलपासून मोदी नव्या संसदेपर्यंत पायी जाणार

Parliament Special Session: देशाच्या विकासाचा गाडा अधिक वेगानं हाकण्यासाठी, नवं संसद भवन (Parliament of India) सज्ज झालं आहे. आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर संसदेच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज नव्या संसद भवनातून सुरू होणार आहे. मंगळवारी (19 सप्टेंबर) संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या संसदीय वारशाचे स्मरण करण्यासाठी आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याची शपथ घेण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या समारंभाचे नेतृत्व उपाध्यक्ष जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला करणार आहेत. अंदाजे दीड तास हा सोहळा सुरू राहणार असून त्याची सुरुवात आणि शेवट राष्ट्रगीतानं होणार आहे. त्यानंतर दुपारचं जेवण होईल आणि मग प्रमुख नेते सर्व खासदारांना नवीन संसद भवनात घेऊन जातील. वाचा सविस्तर 

Modi Cabinet Decisions: महिला आरक्षण विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी, सूत्रांची माहिती, आज नव्या संसदेत सादर होण्याची शक्यता

Modi Cabinet Decisions: मोदी मंत्रिमंडळानं (Modi Cabinet) सोमवारी (18 सप्टेंबर) संसदेच्या विशेष अधिवेशनात (Special Session of Parliament) महिला आरक्षण विधेयकाला (Women's Reservation Bill) मंजुरी दिली असून सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के महिला आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. वाचा सविस्तर 

Anju Verma: प्रेमासाठी पाकिस्तानात गेलेली अंजू परतणार भारतात, मुलांची आठवण आल्याने येणार मायदेशी

Indian Woman in Pakistan: फेसबुकवर चॅटिंग नंतर मैत्री आणि त्यानंतर प्रेम इतकं सगळं करून थेट भारताची बॉर्डर पार करून अंजू वर्मा पाकिस्तानात पोहोचली.  लग्न केलं आणि नाव ठेवलं फातिमा... आता याच फातिमाला पुन्हा भारतात यायचे आहे. महत्त्वाचं म्हणजे, पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरला (Seema Haidar) मात्र भारत सोडायचे नाही. अर्थात, अंजूला पुन्हा भारतात का यायचंय? पण कशासाठी? तसेच कायदेशीरदृष्ट्या ते किती शक्य आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे तिला तिचे कुटुंबीय स्वीकारणार का? हा खरा  प्रश्न आहेत. वाचा सविस्तर 

Ganesh Chaturthi 2023 : शिल्पा शेट्टी, राम चरण ते स्वप्नील जोशी; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचं आगमन

Ganesh Chaturthi 2023 : लाडक्या गणपती बाप्पाचं आज आगमन (Ganesh Chaturthi 2023) होत आहे. बाप्पाचं आगमन झाल्याने आज सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींनीही वाजतगाजत जयघोष करत बाप्पाचं स्वागत (Ganesh Chaturthi Welcomed Ganpati Bappa) केलं आहे. वाचा सविस्तर 

19th September In History : स्वामी विवेकानंदांचे ऐतिहासिक शिकोगा भाषण, अमृतसर शहराची स्थापना आणि युवराज सिंहचे एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार; आज इतिहासात 

मुंबई : स्वामी विवेकानंद या भारताच्या महान सुपुत्राने देशाचं नाव सातासमुद्रापार नेलं, भारतीय संस्कृतीच्या खऱ्या अर्थाने जगाला ओळख करून दिली. त्या स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाशी संबंधित सर्वात महत्त्वाची घडामोड आजच्याच दिवशी घडली होती. 19 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथील धर्मपरिषदेला संबोधित करताना विवेकानंदांनी 'माय अमेरिकन ब्रदर्स अॅन्ड सिस्टर्स' अशी सुरूवात केली आणि सभागृहात टाळ्यांची एकच कडकडाट झाला. तसेच भारतीय क्रिकेट विश्वासाठीही आजचा दिवस महत्त्वाचा असून युवराज सिंहने सहा चेंडूवर सहा षटकार मारले आणि विक्रम केला. वाचा सविस्तर 

19 September 2023 Horoscope : आज गणेश चतुर्थी! 'या' राशीच्या लोकांवर होणार बाप्पाची कृपा, राशीभविष्य जाणून घ्या

19 September 2023 Horoscope Today : आज 19 सप्टेंबर 2023, आजपासून 10 दिवस गणेशोत्सवाला (Ganesh Chaturthi 2023) सुरूवात होत आहे. आजचे राशीभविष्य तुम्हाला तुमची नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांबद्दल अंदाज देते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करण्यात सक्षम व्हाल. ग्रह-तार्‍यांच्या हालचालींच्या आधारे तुमचे तारे आज तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल? तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही संधी आणि आव्हानांसाठी तयार होऊ शकता. जाणून घ्या आजचे राशीभविष्य... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan discharged from hospital : चेहऱ्यावर स्मित हास्त ठेवून सैफची घरात एंट्री #abpमाझाWalmik Karad CCTV : देशमुखांच्या हत्येआधी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये भेट, कराड उपस्थित; ऑफिसबाहेरुन Exclusive आढावाSaif Ali Khan Discharged : सैफ अली खानला डिस्चार्ज, Lilavati रुग्णालयातून घरी दाखल, EXCLUSIVE दृश्येSaif Ali Khan Discharge : व्हाईट शर्ट, डोळ्यांना गॉगल; ६ दिवस उपचार घेऊन सैफ घरी परतला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Embed widget