Monsoon Update : पावसाची चाहूल... मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण, राज्यात 'वरुण राजा' केव्हा बरसणार?
Weather Forecast : चक्रीवादळाच्या सावटाखालीही केरळ, कर्नाटक, गोवा आणि तळकोकणातील किनारपट्टीच्या भागात ढगांची दाटी होताना दिसत आहे. ही परिस्थिती मान्सुनसाठी अनुकुल होत आहे.
![Monsoon Update : पावसाची चाहूल... मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण, राज्यात 'वरुण राजा' केव्हा बरसणार? Monsoon Update Monsoon is likely to enter Maharashtra in the next 24 hours Weather Forecast Monsoon Update : पावसाची चाहूल... मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण, राज्यात 'वरुण राजा' केव्हा बरसणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/08/793e4fca49fb3518eab1bf4223814c901686242778145538_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Monsoon Update : केरळमध्ये (Kerala) दाखल झालेला पाऊस हळूहळू पुढे सरकत आहे. महाराष्ट्राला (Maharashtra) पावसाची प्रतीक्षा लागली असून ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पुढील 24 तासांत महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोव्यासह देशातील काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नवीन सॅटेलाईट फोटोंनुसार, आज सकाळी 8.45 वाजता केरळपासून गोवा आणि दक्षिण कोकणातील काही भागापर्यंतच्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दिसून येत आहेत.
मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण
भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितलं आहे की, चक्रीवादळाच्या सावटाखालीही केरळ, कर्नाटक, गोवा आणि तळकोकणातील किनारपट्टीच्या भागात ढगांची दाटी होताना दिसत आहे. ही परिस्थिती मान्सूनसाठी अनुकुल होत आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
पुढील 24 तासांत राज्यात मान्सूनच्या आगमनाची शक्यता
उपग्रह छायाचित्र ११.४५ रात्री, चक्रिवादळाच्या सावटाखालीही, #केरळ, #कर्नाटक, #गोवा व #तळकोकणातील किनारपट्टीच्या भागात ढगांची दाटी होताना दिसत आहे. परिस्थिती मान्सुनसाठी अनुकुल होत आहे. pic.twitter.com/UC7KiaCzhD
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 10, 2023
आयएमडीने शनिवारी सांगितलं होतं की, पुढील 48 तासांत महाराष्ट्र, गोवा भागामध्ये पावसाचं आगमन होऊ शकतं. नैऋत्य मान्सून आज पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकलेय. पुढील 48 तासांत गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस आणखी सरकण्याची शक्यता आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची शक्यता
त्याआधी 13 जून दरम्यान महाराष्ट्रात तर 16 जूनपर्यंत मुंबईत मान्सून दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, आता चक्रीवादळामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.
मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अनेक भागात रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईसह उपनगरातही मान्सूपूर्व पाऊस झाला. महाराष्ट्रात नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर यासह इतरही अनेक जिल्ह्यात शनिवारी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली.
बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलला
बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पश्चिमी किनारपट्टी भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. बिपरजॉयने चक्रीवादळाने मार्ग बदलला आहे. गेल्या 12 तासांमध्ये चक्रीवादळ हळूहळू उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकत आहे. चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकण्याची शक्यता याआधी हवामान खात्याने वर्तवली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलला! तीव्रता वाढली, तौक्ते चक्रीवादळानंतरचं सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)