एक्स्प्लोर
मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मान्सून सक्रिय

मुंबई : मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मान्सून सक्रिय झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे. आज सकाळी केलेल्या परीक्षणात मान्सून गुजरातच्या वलसाडपर्यंत तसंच मुंबई, नाशिक आणि मराठवाड्यातील परभणी भागात सक्रिय झाल्याचं स्पष्ट झालं. येत्या 48 तासात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 15 ते 18 जूनपर्यंत राज्यभर मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, लातूरसह आठही जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. तर धुळे, नंदुरबार आणि धुळ्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. दरम्यान पाऊस सक्रिय झाला असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असं आवाहन कृषी तज्ञांनी केलं आहे.
आणखी वाचा























