एक्स्प्लोर
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मोबाईलवर सरसकट बंदी
काही दिवसांपूर्वी प्रकल्पातील छोटी मधू या वाघिणीने पर्यटकांच्या एका जिप्सीवर हल्ला केला होता. त्यासोबतच माया वाघीण आणि तिच्या पिल्लांचा पर्यटकांनी अडवलेल्या रस्त्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला होता. हे दोन्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे ताडोबात नियम कसे पायदळी तुडवले जातात हे समोर आलं होतं.
चंद्रपूर: ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मोबाईलवर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय ताडोबा प्रशासनाने घेतला आहे. ही मोबाईल बंदी 1 डिसेंबर पासून अंमलात आणली जाणार आहे. नुकतेच ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालक आणि गाईड यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.
काही दिवसांपूर्वी प्रकल्पातील छोटी मधू या वाघिणीने पर्यटकांच्या एका जिप्सीवर हल्ला केला होता. त्यासोबतच माया वाघीण आणि तिच्या पिल्लांचा पर्यटकांनी अडवलेल्या रस्त्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला होता. हे दोन्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे ताडोबात नियम कसे पायदळी तुडवले जातात हे समोर आलं होतं. या विरोधात कारवाईची देखील मागणी झाली होती. मात्र यावर कारवाई करण्याऐवजी ताडोबा प्रशासनाने असे व्हिडीओ तयार होणार नाही, याची तजवीज केली आहे.
या मोबाईल बंदी मागे ताडोबा प्रशासनाने पर्यटकांनी काढलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे वाघांचं लोकेशन जाहीर होत असल्याचं कारण पुढे केलं आहे. सोबतच गाईड आणि जिप्सी चालक मोबाईलने एकमेकांशी संपर्क करून वाघ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गर्दी करतात. पर्यटक वाघांना त्रास देऊन फोटो आणि सेल्फी काढतात, अशीही कारणं देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे व्याघ्र प्रकल्पात मोबाईल बंदी करणारा ताडोबा राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प ठरला आहे. या मोबाईल बंदीचा नियम मोडणाऱ्यांवर ताडोबा प्रशासन कठोर कारवाई करणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement