MNS vs Shiv Sena : होळीच्या निमित्ताने मनसेकडून शिवसेनेवर टिकेच्या रंगाची उधळण
MNS vs Shiv Sena : मनसे आमदार राजू पाटील यांनी उलटा बॅनर ट्विट करत शिवसनेवर निशाणा साधला आहे. आम्ही अभिनंदन केलं तुम्ही काम कधी करणार, असा सवाल उपस्थित केला.
MNS vs Shiv Sena : उद्योगमंत्री सुभाष देसाई व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच कल्याणमधील एमआयडीमधील रस्ते लवकरात लवकर यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे मनसे अभिनंदन, आम्ही अभिनंदन केलं तुम्ही काम कधी करणार, असा सवाल करत या आशयाचा उलटा बॅनर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट केला आहे. होळीच्या निमित्ताने मनसेकडून शिवसेनेवर टिकेच्या रंगाची उधळण करण्यात आले आहे. तसेच मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या उलटय़ा बॅनरचे ट्वीट चर्चेचा विषय ठरले आहे.
डोंबिवलीतील निवासी भागातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 360 कोटी रुपये मंजूर केले असल्याचा बॅनर शिवसेनेकडून लावण्यात आला होता. काम प्रत्यक्षात सुरु झाले नसल्याने मनसेकडून त्यावर टिका करणारी बॅनरबाजी करण्यात आली होती. 17 फेब्रुवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रस्ते कामाचा शुभारंभ झाला होता. यावेळी व्यासपीठावर मनसे आमदारही उपस्थीत होते. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आत्ता मनसे आमदारांनी काम सुरु झाल्यावर अभिनंदनाचा बॅनर लावावा असा चिमटा काढला होता. त्यावर मनसे आमदारांनी अभिनंदनाचा बॅनर नक्की लावणार, असे स्पष्ट केल होते. प्रत्यक्षात अजून कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या अभिनंदनाचा उलटा बॅनर ट्विट केला आहे. यासंदर्भात आमदार पाटील यांनी एमआयडीसीतील रस्ते कॉन्क्रीटीकरणाचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला होता. आधी कामे चालू करा. लोकांना त्रस होतोय. मी अभिनंदनाचे बॅनर तयार करुन ठेवले आहे. आम्ही विरोधक आहोत. सत्ताधाऱ्याकडून काम कसे करुन घ्यायचे. ही आमची जबाबदारी आहे. होळीच्या निमित्ताने उलटय़ा बॅनरचे ट्विट केले आहे. उलटा बॅनर डोके खाली वर पाय करुन वाचावा लागेल. तुमचे अभिनंदन केव्हाही करु, काम सुरु करा, हा बॅनर सरळ करु असे सांगितले आहे.
गेल्या महिन्यात १७ तारखेला MIDC विभागातील रस्त्यांच्या कॅांक्रीटीकरण करण्याच्या कामाचे आधुनिक पद्धतीने उद्घाटन झाले. मी अभिनंदनाचे बॅनर पण बनवले होते पण अजून काम चालू झाले नाही. काम सुरू करून लवकरच हे बॅनर सरळ करून लावायची संधी द्यावी ही विनंती.@mieknathshinde @Subhash_Desai pic.twitter.com/JBgtqQ9i0j
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 17, 2022