एक्स्प्लोर
... तर मनसे उधळणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!
यवतमाळमध्ये होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उधळून टाकण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला आहे. या संमेलनांचे उद्घाटन इंग्रजीच्या ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सेहगल यांच्या हस्ते होणार आहे.
यवतमाळ : यवतमाळमध्ये होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उधळून टाकण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला आहे. या संमेलनांचे उद्घाटन इंग्रजीच्या ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार आहे. मराठी साहित्य संमेलनात इंग्रजी साहित्यिकांच्या हस्ते उद्घाटन कशाला असे म्हणत मराठी साहित्यिकांच्या हस्ते जर या संमेलनाचे उद्घाटन होत नसेल तर हे मराठी साहित्य संमेलन उधळून लावू असा इशारा मनसेने दिला आहे.
मराठी साहित्यिक राज्यात आणि देशभरात आहेत. त्यांचे साहित्य देशभरात वाचले जात आहे. असे असतांना मात्र मराठी साहित्य संमेलनात इंग्रजीच्या साहित्यिकाच्या हस्ते उद्घाटन कशाला ? असा सवाल मनसेने केला आहे. मराठी साहित्यिकांना का डावलले जात आहे असा सवाल देखील मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केला आहे.
11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या संमेलनात मराठी साहित्यिकांच्या हस्ते उदघाटन झाले तरच संमेलन होईल. अन्यथा हे साहित्य संमेलन उधळून लावू असा इशारा उंबरकर यांनी दिला आहे.
ज्येष्ठ साहित्यिका डॉ.अरुणा ढेरे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आहेत.
कोण आहेत नयनतारा सहगल?
लेखिका नयनतारा सहगल या देशात 'पुरस्कार वापसी'ची सुरुवात करणाऱ्या लेखिका आहेत. मात्र नंतर नयनतारा सहगल यांच्यासह 10 दिग्गज साहित्यिकांनी पुरस्कार पुन्हा स्वीकारले होते. साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची कोणतीही तरतूद नसल्याने आपण हा पुरस्कार पुन्हा स्विकारत असल्याचं सहगल यांनी म्हटलं होतं. नयनतारा सहगल या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाची आहेत.
नयनतारा सहगल यांना त्यांच्या ‘रिच लाईक अस’ (Rich Like Us) या पुस्तकासाठी राजीव गांधीच्या कार्यकाळात म्हणजे 1986 साली साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. मात्र दिल्लीनजीक दादरी गावात गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून बिसारा गावातील काही हिंदू तरूणांनी मोहम्मद अखलाख नावाच्या इसमाला ठार मारलं, म्हणून नयानतारा यांनी हा पुरस्कार परत केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement