एक्स्प्लोर

Raj Thackeray In Pune: मला सदस्य करुन घेतल्याबद्दल मी मनसेचा अभारी आहे म्हणत राज ठाकरेंनी पुण्यात भरला नोंदणीचा पहिला अर्ज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मला त्यांच्या पक्षाचं सदस्य करुन घेतलं त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असं म्हणत त्यांनी स्वत:च्याच पक्षाचे आभार मानले. यावेळी सभागृहात हशा पिकला होता.

Raj Thackeray In Pune:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यातून पक्ष नोंदणीच्या मोहीमेला सुरुवात केली आहे. नोंदणीचा पुण्यात पहिला अर्ज भरत त्यांनी नोंदणी मोहीमेला सुरुवात केली आहे. मनसेच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात या मोहीमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जास्तीत जास्त तरुणांनी आपली नोंदणी करुन घ्यावी आणि पक्षात सहभागी व्हावं, असं आवाहन देखील केलं आहे.

राज ठाकरे त्यांच्या भाषणाच्या उपहासात्मक आणि वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे. त्याच शैलीची प्रचीती पुण्यात देखील आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मला त्यांच्या पक्षाचं सदस्य करुन घेतलं त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असं म्हणत त्यांनी स्वत:च्याच पक्षाचे आभार मानले. यावेळी सभागृहात हशा पिकला होता.

अनेक तरुणांनी मनसेची नोंदणी करा, असं आवाहन करत त्यांनी तरुणांना साद घातली आहे. नोंदणी केल्यावर प्रत्येक महिन्यात नोंदणीकृत व्यक्तीच्या मोबाईलवर एक मेसेज येईल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र हा मेसेज नेमका कशासाठी येणार? किंवा त्या मेसेजमध्ये नोंदणी केलेल्या सदस्यांना काय मिळाणार? या बाबी त्यांनी सध्या गुलदस्त्यात ठेवल्या आहेत. आजपर्यंतची नोंदणी प्रत्येकवेळी मुंबईत झाली मात्र यावेळी मी नोंदणीची सुरुवात पुण्यापासून करण्याचं निश्चित केलं होतं. निवडणूक आयोगानुसार काही वर्षांनी नोंदणी पुन्हा करावी लागते. 2019 मध्ये ही नोंदणी झाली होती. मात्र कोरोनानंतर आजपासून या नोंदणीला सुरुवात होत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 

शस्त्रक्रिया आणि विश्रांती अशा दोन महिन्याच्या कालावधीनंतर राज ठाकरे अँक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी सध्या पुण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचं चित्र आहे. पुण्यात यंदा महापालिकेच्या निवडणूका आहेत. त्यासाठी सगळ्या पक्षांकडून मोठे प्रयत्न सुरु आहे. याच स्पर्धेत टिकण्यासाठी ते सातत्याने पुणे दौरा करत असल्याच्या चर्चा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत सुरु होणाऱ्या सदस्य नोंदणीसाठी यंदा पुणे शहर निवडलं आहे. त्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्रचा सेवक'
आगामी निवडणुकीपु्र्वी राज्यभर मनसेची सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. त्यासाठी नव्या घोषवाक्याचीही घोषणा करण्यात आली आहे. मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्रचा सेवक असं म्हणत त्यांनी या घोषवाक्यात मराठी अस्मितेसह हिन्दूत्वाचा मुद्दा जोडला आहे. यंदा अमित ठाकरे देखील पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. अनेक तरुणांशी विद्यार्थ्यांशी संपर्कसाधत त्यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Raj Thackeray Speech : एकमेकांची उणी दुणी सोशल मीडियावर काढायची असेल तर काढून बघा... : राज ठाकरे

Raj Thackeray : मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप चुकीचा; शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे ॲक्टिव्ह मोडमध्ये! 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget