(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शरद पवारांचे राज ठाकरेंवर लक्ष याचा आम्हाला आनंद : बाळा नांदगावकर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांचं राज ठाकरे, मनसे आणि इंजिनवर लक्ष आहे. इंजिन फास्ट निघाले असे त्यांना दिसत आहे. त्यामुळे ते दखल घेतात याचा मला आनंद आहे, असे मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई : "इतर नेत्यांनी प्रतिक्रिया देणे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी प्रतिक्रिया देणे यामध्ये फरक आहे. शरद पवार कुणालाही प्रतिक्रिया देत नाहीत. परंतु, मनसेची गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. त्यानंतर ठाणे सभेनंतर देखील तातडीने उत्तर दिलं. याचा अर्थ शरद पवार यांचं राज ठाकरे ( Raj Thackeray ), मनसे आणि इंजिनवर लक्ष आहे. इंजिन फास्ट निघाले असे त्यांना दिसत आहे. त्यामुळे ते दखल घेतात याचा मला आनंद आहे, असे मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले आहे.
आज डोंबिवलीत मनसे आमदार राजू पाटील यांच्या पुतणीच्या लग्नासाठी शर्मिला ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर आले होते. यावेळी नांदगावकर यांनी शरद पवार यांचे राज ठाकरेंवर लक्ष अल्यामुळे त्याचा आम्हाला आनंद आहे, असे म्हटले आहे. नांदगावकर यांनी यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या टीकेलाही उत्तर दिले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेमध्ये मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी 3 मेचा अल्टिमेटम दिला आहे. या अल्टिमेटम नंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी अल्टीमेटम फक्त बाळासाहेब ठाकरे देऊ शकतात, अशी टीका केली होती. याबाबत बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, बाळासाहेबांच्या तालमीत राज ठाकरे तयार झालेले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे बरेच गुण राज ठाकरे यांच्यात आले आहेत. अल्टिमेटम हा उपजत गुण असून तो राज यांच्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या