'अजित पवारांचं बोलणं टग्यासारखं आणि रडणं बाईसारखं', गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील व्दंद्व थांबण्याचे नाव घेत नाहीय. आज गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. अजित पवारांचे बोलणे टग्यासारखं आणि रडणं बाईसारखं आहे, अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे.
पंढरपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील व्दंद्व थांबण्याचे नाव घेत नाहीय. आज गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. अजित पवारांचे बोलणे टग्यासारखं आणि रडणं बाईसारखं आहे, अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे. मंगळवेढा येथे ते बोलत होते.
अजित पवार यांनी काल (8 एप्रिल) कासेगावच्या सभेत पडळकरांवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "सध्या एक नेता तुमच्याकडे जोरदार भाषणे करत फिरतोय, त्याचे डिपॉझिट सुद्धा त्याला बारामतीमध्ये वाचवता आलं नव्हतं आणि आता हा कोणाच्या तोंडाने मतं मागतोय? ज्याला स्वतःचे डिपॉझिट वाचवता आलं नाही तो तुम्हाला सल्ले देतोय," असे म्हणत अजित पवार यांनी धनगर नेते आमदार गोपीचंद पडळकर यांची खिल्ली उडवली होती.
Pandharpur bypoll | अजित पवार यांच्या नाईट डिप्लोमसीमुळे भाजपची हवा टाईट
यावर बोलताना पडळकर म्हणाले की, ED नोटीस आल्यावर अजित पवारांचे रडणे जगाने पाहिले. चुलता हेच त्यांचे भांडवल असल्याचे अजित पवार यांनी कबूल करताना त्यांचे कर्तव्य शून्य असल्याचे दाखवून दिले असा टोला पडळकरांनी लगावला.
Pandharpur Bypoll | कासेगावच्या प्रचारसभेत अजित पवारांची तुफान टोलेबाजी; पडळकर, पाटील यांना चिमटे
पडळकर म्हणाले की, आज उपमुख्यमंत्र्यांना गल्ली बोळात दारोदार फिरण्याची वेळ का आली आहे. मी आटपाडीतून येऊन बारामतीत उभरलो आणि डिपॉझिट गेले पण अजित पवार यांच्या पोराचा अडीच लाखाने पराभव का झाला याचे उत्तर द्या? असा सवाल त्यांनी केला.