एकनाथ शिंदेंच्या माजी खासदारांनी विधानपरिषदेचं मैदान मारलं; भावना गवळी अन् कृपाल तुमाने यांचा दणदणीत विजय
लोकसभेच्या निवडणुकीत संधी न मिळालेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी आपला विजयी रथ विधानपरिषदेत मात्र कायम ठेवला आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.
मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यात लोकसभेच्या निवडणुकीत संधी न मिळालेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी आपला विजयी रथ विधानपरिषदेत मात्र कायम ठेवला आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या माजी खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) आणि रामटेक मतदारसंघाचे माजी खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी दणदणीत विजय मिळवत विजय संपादन केला आहे. तर दुसरीकडे महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाल्याची माहिती आहे. महायुतीने निवडणुकीत 9 उमेदवार उभे केले होते. यामध्ये भाजपने सर्वाधिक 5 उमेदवार उभे केले. त्याचवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले होते. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत मात्र महायुतीला मोठे यश आले आहे.
तिकीट कापलेल्या खासदारांना संधी
कृपाल तुमाने हे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळचे खासदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या दबावाखाली एकनाथ शिंदेंनी त्यांची उमेदवारी कापली होती. त्या ठिकाणी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदार राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली होती. रामटेकमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. पण तिकीट कापलेल्या कृपाल तुमाने यांना एकनाथ शिंदेंनी आता विधानपरिषदेची संधी दिली होती. त्यात त्यांनी आपला दणदणीत विजय मिळवला आहे.
तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या पाच वेळच्या खासदार भावना गवळी या यावेळीही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार होत्या. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यामुळे यावेळी त्यांनाच तिकीट मिळणार अशी चर्चा असताना भाजपने मात्र त्यांच्या नावाला विरोध केला. त्यामुळे त्याचं तिकीट कापण्यात आलं आणि ते हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना देण्यात आलं. या ठिकाणीही महायुतीच्या उमेदवारला पराभवाचा धक्का बसला आहे. मात्र यंदा लोकसभा न मिळालेली उमेदवारी मुळे आपला विजयी रथ विधानपरिषदेत मात्र कायम ठेवला आहे.
आतापर्यंत कोणकोणत्या उमेदवारांचा विजय?
भाजपचे विजयी उमदेवार
योगेश टिळेकर - 26 मते
पंकजा मुंडे - 26 मते
परिणय फुके- 26 मते
अमित गोरखे - 26 मते
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार
भावना गवळी
कृपाल तुमाने
काँग्रेस विजयी उमेदवार
प्रज्ञा सातव - 26
विधानपरिषद निवडणुकीत कोणाकोणाला संधी
विधान परिषदेच्या 11 सदस्यांची मुदत 27 जुलै रोजी संपत आहे. या रिक्त होऊ घातलेल्या जागांसाठी आज 12 जुलैला मतदान झाले आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या पाच, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन, तर काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येकी एक उमेदवाराने उमेदवारी या दिवशी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आता एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. यापैकी कोणत्या एका उमेदवाराचा पत्ता कट होणार, हे पाहावे लागणार आहे.
पंकजा मुंडे (भाजप)
परिणत फुके (भाजप)
सदाभाऊ खोत (भाजप)
अमित गोरखे (भाजप)
योगेश टिळेकर (भाजप)
भावना गवळी (शिंदे गट)
कृपाल तुमाने (शिंदे गट)
प्रज्ञा सातव (काँग्रेस)
जयंत पाटील (शेकाप)
मिलिंद नार्वेकर (ठाकरे गट)
शिवाजीराव गर्जे (अजितदादा गट)
राजेश विटेकर (अजितदादा गट)
इतर महत्त्वाच्या बातम्या