एक्स्प्लोर

दिवाळी फराळाचे वाटप करुन मतदारांना प्रलोभन, भाजपचा आरोप, रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल

पुण्यातील कॉंग्रेसचे कसबा पेठचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मतदारांना दिवाळी फराळाचे वाटप करुन प्रलोभीत करत आहेत असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.

Pune News : पुण्यातील कॉंग्रेसचे कसबा पेठचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मतदारांना दिवाळी फराळाचे वाटप करुन प्रलोभीत करत आहेत असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. रविंद्र धंगेकरांकडून वाटप करण्यासाठी निघालेला दिवाळी फराळाचा (Diwali snacks) टेम्पो भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी अडवली आहे. त्यानंतर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात हा फराळाचा टेम्पो नेण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपकडून धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपने तक्रार केल्यानंतर आमदार रविंद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. रविंद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येईल असं पोलीस उपायुक्त संदीप गील यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रविंद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानच्या वतीनं दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येत होते. यानंतर भाजपने ही बाब निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिल्याची माहिती पुण्याचे भाजप प्रवक्ते पुष्कर तुळजापुरकर यांनी दिली.आचारसंहितेचा भंग होत असल्याचे विद्यमान आमदारांना समजत नाही का? असा सवालही तुळजापुरकर यांनी केला आहे. बिनदास्त तुम्ही दिवाळी फराळ वाटत आहेत. तुम्ही पडणार आहेत, म्हणून तुम्ही हे सगळं करताय का? असा सवालही तुळजापुरकर यांनी केला आहे. रविंद्र धंगेकर हे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मार्च 2023 ला झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी ही जागा जिंकली होती. जी भाजपच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती.

सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारांना आपल्या वाजूनं वळवण्यासाठी राजकीय नेते प्रयत्न करताना दिसत आहेत. अशातच भाजपनं आज आपल्या 99 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राश्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट ाणि शिवसेना शिंदे गट यांनी अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नाही. उद्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या महाविका आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये जागावाटप झालेला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या:

पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या तावरेला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे, रविंद्र धंगेकर कोल्हापुरात कडाडले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीच मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीच मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
Umesh Patil :  यशवंत माने, राजन पाटील ते नरहरी झिरवाळ, बड्या नेत्यांनी शिस्त मोडून कारवाई नाही, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात तटकरेंना सवाल
राजन पाटील यांचे 'ते' वक्तव्य, छत्रपती शिवरायांचा दाखला, सुनील तटकरेंना सवाल, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 22 ऑक्टोबर 2024 : 7 PM ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सElection Form Details : निवडणूक अर्ज कसा भरायचा? जिल्हाधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं SambhajinagarVidhan Sabha Superfast News : विधानसभा सुपरफास्ट बातम्या : Maharashtra Assembly Election 2024 : 8 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीच मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीच मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
Umesh Patil :  यशवंत माने, राजन पाटील ते नरहरी झिरवाळ, बड्या नेत्यांनी शिस्त मोडून कारवाई नाही, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात तटकरेंना सवाल
राजन पाटील यांचे 'ते' वक्तव्य, छत्रपती शिवरायांचा दाखला, सुनील तटकरेंना सवाल, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात काय?
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
मी तुतारीची वाट बघतोय! रमेश थोरातांचा अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात करणार प्रवेश 
मी तुतारीची वाट बघतोय! रमेश थोरातांचा अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात करणार प्रवेश 
Embed widget