फडणवीस आणि मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीनं साजरे करतात का ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
हे सरकार तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणार आहे. मग आता फडणवीस आणि मुनगंटीवार हे देखील तिथीनुसार आपले वाढदिवस साजरे करणार का? असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
MLA Jitendra Awhad : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती कधी साजरी करायची? याचा घोळ मुद्दाम घालण्यात आला असल्याचे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी केलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तज्ज्ञांकडून माहिती घेऊन 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात होती. आता हे सरकार तिथीनुसार शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणार आहे? मुनगंटीवार मुलाखतीत म्हणतात की सगळे आता तिथीनुसार होणार. मग देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आपले वाढदिवस तिथीने साजरे करतात का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
सरकारला तिथीनुसार जयंती का साजरी करायचीय?
सरकारला तिथीनुसार जयंती का साजरी करायची आहे? याच्यामागे सरकारला काय करायचे आहे. बहुजन याला विरोध करतील असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. सरकार जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरी करतय? देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीने साजरे करतात का? असा सवाल आव्हाडांनी केला. याच्यामागे त्यांचा हेतू काय आहे? त्याच्यात मला जायचं नाही असे आव्हाड म्हणाले.
भाजपची चिंता वाढली, म्हणून आता चिंतन बैठक घेतायेत
भाजपची चिंता वाढली आहे, म्हणून आता भाजप चिंतन बैठक घेत असल्याचा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. जेव्हा लोकांना काम देऊ शकत नाहीत, त्यामुळं असं ते काही निर्णय घेतात, असे म्हणते तिर्थक्षेत्र योजनेच्या मुद्द्यावरुन आव्हाडांनी सरकारवर टीका केली.
अधिवेशनात विविध मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने
सध्या महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येत आहेत. दरम्यान, कालच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अझित पवार यांनी विविध घोषणा केल्या आहेत. याणध्ये शेतकरी, महिला यांच्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पाचे काही जणांनी स्वागत केले आहे, तर काही जणांनी अर्थंकल्पावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तिथीनुसार जयंती साजरी करण्याच्या मुद्यावरुन उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका केली.
महत्वाच्या बातम्या:
Shiv Jayanti 2024 : आज शिवाजी महाराजांची 394 वी जयंती! वेळ, महत्त्व आणि राजांचा इतिहास जाणून घ्या