एक्स्प्लोर

Deepak Kesarkar : संजय राऊतांना मतदान देऊन चूक झाली, त्यांनी राजीनामा द्यावा, केसरकरांचा निशाणा

संजय राऊत यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करुन आमची चूक झाली आहे. त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी, असे वक्तव्य शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केलं

Deepak Kesarkar on Sanjay Raut : संजय राऊतांना आमच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे वक्तव्य शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केलं आहे. संजय राऊत यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करुन आमची चूक झाली आहे. त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असेही ते म्हणाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर संजय राऊतांना बाहेर काढलं असतं. बाळासाहेब असते तर भाजपसोबतची युती तुटलीच नसती असेही केसरकर म्हणाले.

दरम्यान, आमच्या बाजूने बहुमत आहे. अंतिम विजय हा सत्याचा होणार आहे. आम्हाला कोर्टात न्याय मिळेल असेही दीपक केसरकर म्हणाले. आमच्या पार्टीचं अस्तित्व कायम आहे. एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत असेही ते म्हणाले. उपसभापतींनी चुकीचे निर्णय दिले आहेत. 55 पैकी 14 ते 15 लोक घेऊन तुम्ही पक्षाच्या नेत्याला काढू शकत नसल्याचे केसरकर म्हणाले. आपले सहकारी मंत्री जर इतर ठिकाणी गेले तर राज्याचा कारभार सुरळीत चालवणे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे. त्यांनी गुवाहाटीला गेल्याल्या मंत्र्यांची खाती इतर मंत्र्यांकडे देऊन त्यांचे कर्तव्य केल्याचे केसरकर म्हणाले.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मतदान घेऊन निवडून या, राऊतांना केसरकरांचा टोला

संजय राऊत आधी टीका करतात आणि परत सावरण्याचा प्रयत्न करतात. आधी ते शिंदे साहेबांना काढून टाका म्हणत होते, त्यानंतर ते त्यांची समजूत काढायला मिलिंद नार्वेकरांना पाठवतात. त्यांचे नेहमी असेच असते, त्यांचे नेहमी टायमिंग चुकते असेही केसरकर म्हणाले. संजय राऊतांनी आमच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली आहे. तुमच्याकडे थोडीशी जरी नितीमत्ता असेल तर तुम्ही त्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मतदान घेऊन निवडून या असा टोलाही केसरकर यांनी लगावला. आमची मत घेऊन आमच्याबद्दल असे चुकीचे बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नसल्याचे ते म्हणाले. संजय राऊतांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही दुसऱ्यांना विनंती करु की त्यांच्याविरोधात कोणीही निवडणूक लढवू नका यांना बिवनिरोध करा. त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जावं असेही केसरकर म्हणाले. 

संजय राऊत 50 टक्के ते राष्ट्रवादीचे आणि 50 टक्के शिवसेनेचे

संजय राऊत हे अर्धा वेळ शिवसेनेचे आणि अर्धा वेळ शिवेसेनेचे प्रवक्ते आहेत. 50 टक्के ते राष्ट्रवादीचे आणि 50 टक्के शिवसेनेचे असल्याचे केसरकर म्हणाले. असा प्रवक्ता कोणत्याही पक्षाला लाभू नये अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो असेही ते म्हणाले. संजय राऊतांनी गुवाहाटीला येऊ नये अशीच माझी ईच्छा आहे. मी कसबस आमदारांना रोखून धरलं आहे. त्यांना काही बोलू नका म्हणून विनंती केल्याचे केसरकर म्हणाले. टीका केल्यावर कोणाही गप्प बसणार नाही, आम्ही शिवसैनिक आहेत असेही केसरकर म्हणाले.  



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Embed widget