अध्यक्ष न्यायालयाच्या दबावाला ऐकत नाहीत, आम्ही काय दबाव टाकणार? ठाकरे गटाचे आमदार थेटचं बोलले
Shiv Sena MLA Disqualification Case : जे अध्यक्ष न्यायालयाच्या दबावाला ऐकत नाहीत. त्यांच्यावर आम्ही काय दबाव टाकणार? आमच्या दबावला ते घाबरणार का ? निर्णय घ्यायला किती टाळाटाळ केला हे लहान मुलाला सुद्धा कळतंय, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केली.
MLA Ajay Chaudhary on Shiv Sena MLA Disqualification Case : जे अध्यक्ष न्यायालयाच्या दबावाला ऐकत नाहीत. त्यांच्यावर आम्ही काय दबाव टाकणार? आमच्या दबावला ते घाबरणार का ? निर्णय घ्यायला किती टाळाटाळ केला हे लहान मुलाला सुद्धा कळतंय, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केली. एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. याबाबत उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच पत्रकार परिषद घेत टीका केली होती. यावर अध्यक्षांनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, असे सांगण्यात आले होते. याबाबत आता अजय चौधरी यांनी बोचरी टीका केली.
अखेरच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच -
जो काही निर्णय येईल, त्यासाठी आम्ही तयार आहोत. जर आम्ही अपात्र ठरलो तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावू. एक पैशाचं टेन्शन आमच्या पक्षाला नाही. आम्ही आमच्या पक्षासाठी शिवसेनेसाठी डोक्याला कफन बांधून उतरलेले लोक आहोत. आम्ही आमदार असू नसो सच्चा शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमच्या जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांच्यासोबत आहोत, असे अजय चौधरी म्हणाले.
शिवसैनिकाला तयारी करण्याची गरज नाही -
पक्षासाठी आम्ही आमचे आमदारकी कधीही बहाल करायला तयार आहोत. शिवसैनिकाला तयारी करण्याची गरज नाही, आम्ही नेहमीच तयार असतो. शिंदे गटातले जे आमदार साक्षीकरिता आले होते, त्यांची ब्रेन मॅपिंग केली गेली. त्यांना सूचना दिल्या गेल्या, त्यांनी उत्तर काय द्यायची हे शिकवलं गेलं. आमचा सुनील प्रभू बिंदास भिडत होता, असे अजय चौधरी यांनी सांगितलं.
जनतेची भूमिका काय ?
बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी घटना आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश सूचना दिल्यात, त्यानुसार विधानसभा अध्यक्ष आपली सदसद विवेकबुद्धी वापरून घटनेचा आदर ठेवून ज्यांनी पक्षाची गद्दारी केली, पक्ष ज्यांनी सोडला, त्यांच्या विरोधात निर्णय देतील असं मला वाटतं, असेही अजय चौधरी म्हणाले. लोकशाहीच्या हिताचा आणि महाराष्ट्राला अभिप्रेत असलेला निर्णय घेतील, असे ते त्यांच्या मुलाखतीत अध्यक्ष म्हणत आहेत. आता जनतेची भूमिका काय आहे हे माध्यमांनी घेतलेली आहे, असेही अजय चौधरी म्हणाले.
त्यांच्यावर आम्ही काय दबाव टाकणार?
जे अध्यक्ष न्यायालयाच्या दबावाला ऐकत नाहीत, त्यांच्यावर आम्ही काय दबाव टाकणार? आमच्या दबावला ते घाबरणार का ? निर्णय घ्यायला किती टाळाटाळ केला हे लहान मुलाला सुद्धा कळतंय. एखादा आरोपीला न्यायाधीश शिक्षा होण्याच्या आधी भेटले तर ते जनतेच्या दृष्टीने चांगला आहे का ? मुख्यमंत्री जरी राज्याचे असले तरी लावादासमोर ते आरोपी आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा जर अध्यक्ष आदर राखणार असतील तर त्यांना त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल, असे अजय चौधरी म्हणाले.
आणखी वाचा :
भरत गोगावले नियमबाह्य, शिंदे गटाचे आमदार 100 % अपात्र होतील, भास्कर जाधवांचा दावा