एक्स्प्लोर

दिवसभर प्रयत्न करुनही 'मिशन बिबट्या' फेल; एक फायर चुकवत नरभक्षक पसार

करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या बिबट्याला मारायचे आजचे सर्व प्रयत्न फेल झाले आहेत.त्यामुळे परिसरातील नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

करमाळा : करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या बिबट्याला मारायचे आजचे सर्व प्रयत्न फेल गेल्याने बिबट्याचे वास्तव्य असलेल्या चिखलठाण परिसरात मोठी दहशत पसरली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता याच ठिकाणी एक 9 वर्षांच्या ऊसतोड मजुरांच्या मुलीवर हल्ला केला होता. मुलीचा आवाज ऐकताच इतर ग्रामस्थ काठ्या घेऊन आल्यावर त्याने मुलीला सोडून शेजारील उसात पळ काढला होता. यानंतर मोठ्या संख्येने वन विभाग व पोलिसांचा सशस्त्र फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि सुरू झाले मिशन बिबट्या.

दिवसभर प्रयत्न करुनही 'मिशन बिबट्या' फेल; एक फायर चुकवत नरभक्षक पसार या ऊस फडाशेजारी वागर (जाळं) लावून वन विभागाचे गन मॅन, शार्प शूटर व पोलीस अधिकारी उसात जाऊन तपास करीत होते. त्यामुळे बिबट्याने मोर्चा शेजारील केळीच्या बागेत वळवला. येथे शार्प शूटरने फायर केले. मात्र, ते चुकवत बिबट्याने परत उसात धूम ठोकली. यानंतर वन अधिकाऱ्यांनी सर्व ऊस चारी बाजूने पेटवताच बिबट्या एका बाजूने दुसऱ्या केळीच्या बागेत निसटल्याने हे मिशन फेल झाले. या सर्व नाट्यमय घडामोडी घडत असताना करमाळा आमदार संजय शिंदे हे आपले पिस्तूल घेऊन ग्रामस्थांच्या सोबत थांबले होते. आता रात्री नव्याने सर्च लाईटमध्ये पुन्हा वन विभाग सर्च ऑपरेशन राबवणार आहे.

दिवसभर प्रयत्न करुनही 'मिशन बिबट्या' फेल; एक फायर चुकवत नरभक्षक पसार

एक डिसेंबरपासून हा बिबट्या करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी, अंजनडोह आणि आज शेटफळ चिखलठाण परिसरात आपली दहशत ठेऊन आहे. आजपर्यंत तीन जणांचा बळी ह्या बिबट्याने घेतला आहे. आज चिखलठाण परिसरातील बारकूंड यांच्या शेतात तो दिसला होता. शार्प शूटर डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्यासह पाच गनमॅन ट्रॅप लावून बसले होते. बिबट्याला घेरण्यासाठी ऊस चारही बाजूने पेटवून दिला. पण त्याला अंदाज आल्याने बिबट्या सर्वांना गुंगारा देऊन निसटला आहे.

दिवसभर प्रयत्न करुनही 'मिशन बिबट्या' फेल; एक फायर चुकवत नरभक्षक पसार

साडे चार वर्षे त्याचे वय असावे असा अंदाज डॉ. मंडलिक यांनी व्यक्त केलं आहे. शेटफळ परिसरातील लोकांनी सायंकाळी पाच ते सात आणि सकाळी दहा ते बारापर्यंत काळजी घ्यावी, कारण हा त्याचा हल्ला करण्याची वेळ आहे. हा बिबट्या जनावरांवर हल्ला करत नाही. तो फक्त माणसांवर हल्ला करतो. कदाचित माणसामुळे तो डिस्टर्ब झाला असावा, असा अंदाज मंडलिक यांनी व्यक्त केला. पण आज रात्री पेट्रोलिंग करून बिबट्याला मारू असा विश्वास त्यांना आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget