एक्स्प्लोर
मिरजेत खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
हा प्रकार मुलीच्या कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर पीडित मुलीने पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी आरोपी करपेवर अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार, अॅट्रोसिटी असे गुन्हे दाखल झाले असून आरोपी सुनील करपे याला पोलिसांनी अटक केली आहे.
सातारा : मिरजमध्ये खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाला मिरज पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीने मिरज गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली होती.
पीडित मुलगी 15 वर्षाची असून ती सध्या नववीत शिकत आहे. सुनील करपे असे अत्याचार करणाऱ्या खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. करपेच्या खाजगी क्लास मध्ये पीडित मुलगी क्लासला जात होती.
त्याच बरोबर पीडित मुलीच्या घरात शिक्षकाने जेवनाचा डबा ही लावला होता. त्यामुळे सुनील करपे याचे घरात येणे जाणे होते. या काळात पीडित अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यावर सुनील करपे याने अत्याचार केला. त्यातून मुलगी गरोदर देखील राहिली.
हा प्रकार मुलीच्या कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर पीडित मुलीने पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी आरोपी करपेवर अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार, अॅट्रोसिटी असे गुन्हे दाखल झाले असून आरोपी सुनील करपे याला पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement