एक्स्प्लोर
महिला सुधारगृहातून पळालेल्या 'त्या' मुलीवर दोनदा गँगरेप

नागपूर : महिला सुधारगृहातून पलायन केल्यावर बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 21 एप्रिलला सामूहिक बलात्काराआधी 20 एप्रिललाही याच मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता. नागपूरच्या खामला परिसरात नेऊन तीन आरोपींनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यातील दोन आरोपी ऑटोचालक कृष्णा डोंगरे (24 वर्ष) आणि जीतू मंगलानी (22 वर्ष) यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर सचिन बावने (24 वर्ष) हा आरोपी फरार झाला आहे. 20 एप्रिलला नागपूरच्या महिला सुधारगृहातून चार मुलींनी पलायन केलं होतं. यापैकी एका अल्पवयीन मुलीवर 2 वेळा सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अल्पवयीन मुलीवर 20 एप्रिल रोजी तिघांनी खामला परिसरात नेऊन सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर 21 एप्रिलला दुसऱ्या गँगकडे या मुलीला सोपवण्यात आलं. तिच्यावर सुगत नगरमधील पडक्या घरात पुन्हा गँगरेप करण्यात आला. नागपुरात महिला सुधारगृहातून पळालेल्या मुलीवर बलात्कार आतापर्यंत 21 एप्रिलला झालेल्या सामूहिक बलात्कारात 7 आरोपी होते. यापैकी सातही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र 20 एप्रिलच्या घटनेनंतर आरोपींची संख्या 10 वर पोहोचली आहे. 20 एप्रिल च्या प्रकरणात 3 आरोपी आहेत, यापैकी 2 अटकेत आहेत. 21 एप्रिल च्या घटनेत 7 आरोपी आहेत सर्व अटकेत आहेत. काय आहे प्रकरण? नागपूरच्या सदर भागातील महिला सुधारगृहातून 20 एप्रिल रोजी चार मुलींनी पळ काढला होता. त्यातील एका अल्पवयीन मुलीवर खामला परिसरात नेऊन तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. गुरुवारी ही घटना घडली. या घटनेनंतर या अल्पवयीन मुलीला दुसऱ्या गँगकडे सोपवण्यात आलं. सुगत नगरमधल्या पडक्या इमारतीत तिच्यावर पुन्हा सामूहिक बलात्कार करण्यात आला. शुक्रवारी ही घटना घडली आहे. पळालेल्या चार पैकी तीन मुली वेगळ्या ठिकाणी गेल्या. या तीनही मुलींना पोलिसांनी शोधून काढलं आहे. त्यावेळी त्याच भागातल्या तीन फेरीवाले आणि एका रिक्षा चालकाने दुष्कृत्य केलं. तसंच त्यांना साहाय्य करणाऱ्या तिघांना असं एकून सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोन सामूहिक बलात्कारानंतर पीडित मुलीला दुसऱ्या दिवशी सीताबर्डी परिसरात आणून सोडलं. तेव्हा स्थानिकांनी तिला पोलिस स्टेशनमधे नेऊन सोडलं. त्यानंतर पीडितेने महिला सुधारगृहाच्या अधिक्षिकेला बोलावलं आणि सगळा प्रकार सांगितला. या प्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित बातम्या : नागपूर सुधारगृहातून पळालेल्या तिन्ही मुली सापडल्या! नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार नागपूरच्या आमदार निवासातील गँगरेपबाबत धक्कादायक माहिती नागपूर आमदार निवासाचे नियम कडक, ‘माझा’च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























