एक्स्प्लोर

Ramdas Athawale : राज ठाकरेंनी बाळासाहेबांना धोका दिला, आता भगव्या रंगाच्या विरोधात त्याचं काम, रामदास आठवलेंचा निशाणा

राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना धोका दिला असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं.

Ramdas Athawale on Raj Tahckeray : राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना धोका दिला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव घेण्याचा त्यांना अधिकार नसल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale ) यांनी केलं. त्यांनी शिवसेना सोडली आहे. राज ठाकरेंनी आता अंगावर भगवे वस्त्र धारण केले ते चांगले आहे. पण राज ठाकरे यांनी शांततेची भूमिका मांडावी असेही आठवले म्हणाले. आता भगव्या रंगाच्या विरोधात त्यांचे काम सुरु असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले.

राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करताना सर्व रंगाचे झेंडे आणले होते. पण आता एकच भगवा रंग परिधान केला आहे. पण भगव्या रंगाच्या विरोधात त्यांचे काम सुरू असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली. रामदास आठवले आज सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीचे सरकार जनतेला न्याय देण्यासाठी अपयशी ठरले आहे. या सरकारमधील नेते एकमेकांवर कुडघोड्या करण्याचे काम करत आहेत. तर या सरकारमध्ये काँग्रेसला डावलले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांना मी विनंती करणार आहे की, काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा. आमची सरकार बनवण्याची तयारी आहे असेही आठवले म्हणाले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मी होतो. पण त्यांचा सिम्बॉल घेऊन मी निवडणूक लढवली नाही. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सिम्बॉल घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितले. 

ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे याला माझाही पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्वांना सोबत घेऊन जातात. राज्याच्या विकासात भर त्यांनी भर टाकली आहे. बाबरी मशीदीबद्दल राजकारण सुरु आहे. एल्गार परिषदमुळे दंगल झाली या मताशी मी सहमत नसल्याचे आठवले म्हणाले. राज ठाकरे हे कोणाचे न ऐकणारे नेते आहेत. भाजपच्या नेत्याचा त्यांना पाठिंबा नाही. जे आरोप केले जातात ते चुकीचे आहेत. त्यांना वाटले हिंदुत्व हा मुद्दा घेतला तर त्याचा फायदा होईल असेही आठवले यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget