एक्स्प्लोर

जलसंधारण मंत्री राम शिंदे जेव्हा कबड्डीच्या मैदानात उतरतात...

कर्जतला राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला.

अहमदनगर : जलसंधारणमंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे चक्क कबड्डीच्या मैदानात उतरलेले पाहायला मिळाले. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतला राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. मात्र राम शिंदे यांच्या संघाचा निसटता पराभव झाला. कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संघाने राम शिंदेंच्या संघावर मात केली. दोन्ही संघात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी सहभाग होता. राम शिंदे यांनी स्पोर्ट्स ड्रेस परिधान करुन झोकात एंट्री केली. यावेळी प्रेक्षकांनीही टाळ्या-शिट्ट्या वाजवून उत्स्फूर्त दाद दिली. राम शिंदे विरुद्ध नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संघात शनिवारी सायंकाळी प्रदर्शनीय सामना रंगला. या सामन्यात पालकमंत्री शिंदे यांच्या संघाला पाच गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. राऊत यांच्या संघाने नाणेफेक जिंकली. सुरुवातीपासूनच नगराध्यक्ष राऊत यांचा संघ आघाडीवर होता. मात्र दुसर्‍या सत्रात शिंदे यांच्या संघाने आक्रमक खेळ केला. पण नगराध्यक्षांच्या संघाने मंत्री महोदयांच्या संघावर मात केली. नगराध्यक्ष राऊत संघाने 21, तर पालकमंत्री संघाने 16 गुण मिळविले. कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी उत्कृष्ट खेळी करुन शिंदे यांच्या संघावर मात केली. राम शिंदे यांच्या संघात शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, बापूराव तोरडमल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, त्रिमूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष महेंद्र गुंड, क्रीडाशिक्षक सुनील नेवसे, रेल्वे अधिकारी प्रशांत पाटील, गणेश जेवरे, शिवाजी धांडे, प्रकाश धांडे, राजेंद्र खराडे यांचा समावेश होता. तर नगराध्यक्ष संघात रावसाहेब गरड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, चापडगावचे सरपंच आप्पासाहेब घनवट, सचिन धोदाड, राम ढेरे, अनिल गदादे, व्यापारी अभय बोरा यांचा समावेश होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Embed widget