एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : मामावरील कारवाईनंतर भाच्याची प्रतिक्रिया, आदित्य ठाकरे म्हणाले......

श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर ई़डीने (ED) कारवाई केली आहे. या कारावाई संदर्भात प्रसारमाध्यमांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Aaditya Thackeray :  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर ई़डीने (ED) कारवाई केली आहे. या कारावाई संदर्भात प्रसारमाध्यमांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले की, नौदलाच्या कार्यक्रमात राजकीय भाष्य मी करणार नाही. ही जागा राजकारणावर भाष्य करण्याची नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. यासंदर्भात मी सभागृहात बोलणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. नौदलानं आयोजीत केलेल्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे आले असता, त्यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, देशाचं रक्षण करणं ही भाग्याची गोष्ट असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई आणि महाराष्ट्राचे नौदलासोबत एक वेगळं नात आहे. नौदलाची खूप मोठी परंपरा आहे. प्रत्येकाला आपल्याला अभिमान वाटेल असे नौदलाचे काम असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई़डीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती. 

ईडीने प्रसिद्धीपत्रक काढून या कारवाईची माहिती दिलीय. 6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. 2017 मध्ये मेसर्स पुष्पक बुलियन्स या पुष्पक ग्रुपच्या एका कंपनीविरोधात ही कारवाई होती. मात्र आज झालेली जप्तीची कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या म्हणजेच श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या रहिवासी सदनिका आहेत. या सदनिका ठाण्यातील निलांबरी गृहप्रकल्पातील आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

BMC News: राज्यात भयावह दुष्काळ, शेती-गुरांना पाणी नाही अन् मुंबईत BMC चा पाण्याने रस्ते धुण्याचा घाट, सत्ताधारी अन् विरोधकांनी प्रशासनाला घेरलं, नेमकं काय घडलं?
राज्यात भयावह दुष्काळ, शेती-गुरांना पाणी नाही अन् मुंबईत BMC चा पाण्याने रस्ते धुण्याचा घाट, सत्ताधारी अन् विरोधकांनी प्रशासनाला घेरलं, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Nagpur: 'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
Satara Crime: साताऱ्यात बापाने मुलीला संपवलं, भानावर येताच एआयला विचारलं, पुरावे कसे नष्ट करु? AI ने काय उत्तर दिलं?
साताऱ्यात बापाने मुलीला संपवलं, भानावर येताच एआयला विचारलं, पुरावे कसे नष्ट करु? AI ने काय उत्तर दिलं?

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Embed widget